शालेय पोषण आहार योजनेतील माझी भूमिका

47

स्वास्थ्याला द्या तुम्ही, तुमच्या आयुष्यात पहिला क्रमांक.गोळ्या औषधांसाठी लक्षात ठेवावी लागणार नाही वेळ आणि दिनांक

पूर्वीच्या काळात आपली वडीलधारी मंडळी नेहमीच म्हणायचे, आहार असा असावा की, आपल्या कुणालाही आजार होणार नाही. यासाठी आपल्या ला डोळसपणे प्रयत्न करणे आवश्यक असते. हाच दृष्टीकोन पुढे ठेवून भारतातील नवीन पिढी सुदृढ व निरोगी घडवण्याच्या हेतूने तसेच प्राथमिक शाळेतील पटनोंदणी व उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी व गळती थांबविण्यासाठी राज्यात२२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ली ते ५वी ला शालेय पोषण आहार योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये पुन्हा केंद्र शासनाने विस्तार पुर्वक चर्चा व विचारविमर्श करून इयत्ता ६वी ते ८वी करिता २००८-०९पासून ही योजना लागू केली.
सुरुवातीला विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे शेकडा प्रमाण ८०%असेल अशा विद्यार्थ्यांना ३ किलो तांदूळ घरी दिले जायचे परंतु यानंतर सुद्धा कुपोषण व उपासमारीचे प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात कमी झाले नाही व विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा या दृष्टिकोनातून २००१पासून तांदूळ घरी न देता शाळेतच अन्न शिजवून देणे सुरू केले.
*जो घेईल सकस आहार, त्याला न होईल कधी आजार*
शालेय पोषण आहार योजना राबविली जात असतांना मी एक जबाबदार शिक्षिका असून माझे सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांप्रती, देशाप्रती व शासनाच्या योजनेचा पुरेपूर व योग्य स्वरुपात सर्व विद्यार्थ्यांना फायदा मिळावा म्हणून माझे कर्तव्य, माझी जबाबदारी मी पुर्णपणे पार पाडत असते.
शालेय पोषण आहार धान्याची उचल करतांना*
शाळेत पुरवठा दाराकडून धान्यादी मालाचा दर्जा योग्य आहे का? त्यांचे वजन ठराविक मापानुसार आहे का? शिलबंद पाकीटातील साहीत्यावरील वैधता दिनांक तपासून ते कोणत्या महिन्यापर्यंत वापरण्यास योग्य आहे याची शहानिशा केली जाते. सोबतच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष /सदस्य वेळेवर जे सहज उपलब्ध होवू शकतात त्यांना बोलावून व स्वंयपाकिणीताईंच्या मदतीने संपुर्ण चौकशीअंती सर्व मालाची उचल केली जाते.
धान्याची साठवणूक
शासनाकडून प्राप्त झाले ला संपुर्ण धान्य साठा कोठी, डब्बे व सिलबंदकरून (आवश्यकतेनुसार वाळवून) स्वंयपाकिणीताईंच्या कडून ठेवले जाते. सोबतच धान्य साठवूनक खोलीमध्ये उंदीर, घुस सारख्या प्राण्यांचा प्रादुर्भाव होणार नाही व किड लागणार नाही. खोलीचे वातावरण दमट राहुन कुबट वास येणार नाही तसेच खोलीमध्ये हवा खेळती राहील व धान्य काढताना पुरेसा प्रकाश राहिल याची सुद्धा काळजी घेण्यात येते.
*पोषक आहार देऊया, सुदृढ बालक बनवुया*
*अन्न शिजवतांना*
ज्या भांड्यामध्ये अन्न शिजवले जाते ती भांडी स्वच्छ व निटनेटकी अ सावित्री. स्वंयपाकिणीताईंचे केस बांधलेले असावेत,नखे कापलेली असावी. त्यांना कोणत्याही प्रकारचे उदा. खरूज, सारखे संसर्गजन्य आजार तर नाही याची काळजी घेतली जाते. वर्षातून दोनदा स्वंयपाकिणीताईंची आरोग्य तपासणी करून घेतली जाते. अन्न शिजवताना पाणी निर्जंतुक वापरणे, भाजीपाला स्वच्छ व प्रथिने उस्मांक असावेत, पाणी मोजके टाळणे. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण असावे, स्वंयपाकगृहातील स्वच्छता व निटनेटकेपणा असावा. विषबाधा किंवा कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. लहान मुले स्वंयपाकगृहाकडे जाणार नाही यासर्व गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष ठेवले जाते.
*शिजवलेले अन्न*
अन्न शिजल्यानंतर ते विद्यार्थ्यांना देण्याजोगे आहे किंवा नाही याकरिता शाळेतील एक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी किंवा पालक यापैकी कुणीतरी ठरवल्याप्रमाणे एकजण ग्रहण करून तशी नोंद चवरजिष्टर मध्ये केली जाते. नंतरच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित वेळेत जेवन दिले जाते.

*अन्न हे पुर्ण ब्रम्ह, स्वच्छ ताजे अन्न,शरीराचे पोषण अन्न, सेवन करावे पुर्णान्न*.
*पोषण आहार ग्रहण करतांना*
सर्व विद्यार्थी वर्गनिहाय हात स्वच्छ धुवून पंगतीत बसतात. इयत्ता १ली ते७वीचे सर्व विद्यार्थी एकत्र सामुहिक रितीने ‘वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे………’ श्लोक म्हणतात व जेवन करतात. विद्यार्थीनी ना पोषण आहार देत असतांना दररोज दोन दोन शिक्षक आपल्या नियोजनातील पाळीनुसार (हात धुणे, ताट, बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, तरळपट्टी, इत्यादी) गोष्टींकडे लक्ष पुरवतात. हे सर्व नियोजन बद्ध असल्याने कोणतीही अडचण होत नाही.

*हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रम्हरुप जाण,जे जीवन हेतू कारण, विश्वा य या*
याचाच अर्थ असा अन्नाला साधारण मानु नये. अन्न ब्रम्हस्वरुप आहे. जसे विश्व ब्रम्हातून उत्पन्न होते, ब्रम्हत्वस्य जगते आणि ब्रम्हातच विलिन होते. तसेच प्राणीमात्र अन्नापासुनच जगतात आणि अन्नातच विलीन होतात.
*आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नये, अन्नाचा कण आणि आनंदाचे क्षण*

*पुरक आहार व नोंदी*
आठवड्यातून एकदा पुरण आहारांतर्गत बिस्किटे, केळी, चुरमुरे असे आलटून पालटून दिले जातात व तशाप्रकारच्या नोंदी घेतल्या जातात.
*पपई गाजर खाऊ स्वस्त,डोळ्यांचे आरोग्य ठेऊ मस्त*

*शालेय पोषण आहार नोंदवही*
शालेय पोषण आहार योजना अंतर्गत असलेल्या चवरजिष्टर, स्टाकबुक, दैनंदिन उपस्थिती, अन्नधान्य साहित्य वापर नोंदवही नियमित भरल्या जाते व दररोज आनलाइन उपस्थिती नोंदविली जाते.

हे सर्व शाळा सुरू असताना शाळा स्तरावर असले तरी शाळा बंद असून आता कोविड19 च्या प्रादुर्भावाने संपुर्ण जगाला ग्रासलेले आहे. अशावेळी सर्वांनाच सकस आहार व सुरक्षित राहणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून मी आपली जबाबदारी नित्यनेमाने पार पाडत असून त्याकरिता गृहभेटी, फोनवर चर्चाद्वारे, विद्यार्थीनी व पालकांना मी नेहमी पोषण आहार व घ्यावयाची काळजी, स्वच्छता व सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करित असते.
आपल्या चांगल्या आरोग्याची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडत असते. त्यामुळे चांगल्या आहार विहाराने स्वतःला नेहमी ताजेतवाने ठेवा. रोजच्या जेवणात पोषक तत्त्वांचा समावेश आवर्जून करा.
*अन्न तयार करताना स्वच्छतेचा अवलंब करावा*
हात धुणे, स्वच्छ भांड्यांचा वापर अन्न शिजविण्यासाठी करणे, भाज्या, फळे, धान्य, स्वच्छ निवडून आणि धुवून अन्न शिजवणे जेणेकरून जंतूसंसर्ग होणार नाही.
*मिश्रडाळी, कडधान्य यांचा आहारात समावेश करावा*
ज्यामुळे आहारातील पोषणमूल्यांचा दर्जात सुधारणा होते. डाळी न कडधान्ये ही अपुर्ण पोषक मुल्ये असतात म्हणून डाळी व कडधान्य यांचे एकत्र मिश्रण करून वापरावे. उदा. खिचडी, इडली, अप्पे, मिश्रडाळीचे डोसे, टिमणे, थालीपीठ, इत्यादी.
*पीठ चाळु नये*
कुठल्याही प्रकारची पीठं चाळु वापरू नये कारण पिठाच्या कोड्यात सत्व असते. जे शरिरासाठी आवश्यक असते. मैद्याचा वापर कमीतकमी करावा किंवा शक्यतो वापर करू नये.
*भाज्यांची सालं काढु नयेत*
जास्त बारीक चिरू नये, उघड्या भांड्यात शिजवु नये या गोष्टींनी पदार्थातील पोषणमूल्यांचा ऱ्हास होतो. हा ऱ्हास टाळण्यासाठी शक्य असतील त्या फळांच फळांच्या साली खाव्यात. थोड्या मोठ्या फोडी कराव्यात आणि शिजवताना झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवावे. ज्यामुळे पोषणमूल्य टिकून राहतात तसेच परत परत भाजी शिजवू नये.
*तांदूळ, डाळी जास्त चोळून धुऊ नये*
सर्व प्रकारची धान्ये, डाळी, कडधान्यांच्या बाहेरील आवरणात काही मायक्रोन्युट्रिशिअन्स असतात जे पाण्यात विरघळून नाहीशे होतात. म्हणूनच धान्य, कडधान्ये व डाळी चोळून चोळून धुऊ नये.
*अति प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे*
अन्न पदार्थावर जास्तीत जास्त प्रक्रिया केली की त्यांच्यामधील नैसर्गिक रित्या उपलब्ध पोषणमूल्यांचा ऱ्हास होतो. ज्यामुळे आहारातील पोषणमूल्यांचे शरीरात शोषण न होता अनावश्यक उष्मांकामुळे अनियंत्रित वजन वाढु लागते. तसेच जीवनशैली शी निगडित जसे की मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार होतात. अशा लहान सहान गोष्टींची आपण नीट काळजी घेतली तर आहारातून योग्य प्रमाणात पोषण होवून शरीराचे आजारापासून संरक्षण होऊ शकते व आपण निरोगी जीवन जगू शकतो. आजारपणात आपल्याला आरोग्य सेवा वापरावी लागते पण आपण जर योग्य आहार घेतला तर आपल्याला आरोग्याशी निगडित काहीही अडचणी येणार नाही किंवा कमी प्रमाणात होवून आपल्याला आरोग्यसेवेची गरजसुद्धा पडणार नाही आणि हे सर्व आपल्या हातात आहे. हीच मी शालेय पोषण आहार योजनेसंदर्भातील जबाबदारी पार पाडुन शाळा जरी बंद असल्या तरी माझ्या विद्यार्थीनी ची व पालकांची काळजी मी घेत असते.
स्वस्थ रहा आणि घरात तयार केलेले अन्न सेवन करा ताज्या फळांचा आणि भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा

✒️लेखिका:-सौ.जयश्री निलकंठ सिरसाटे
सहाय्यक शिक्षिका
जि प पूर्व माध्यमिक कन्या शाळा सावरीटोला पं.स गोंदिया जिल्हा गोंदिया