

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी):-9075913114
बीड(दि.29सप्टेंबर):-जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे शेतकरी राज्याचे भारी नुकसान झाले आहे.शेतात पीक कमी आणि पाणीच पाणी दिसत आहे.या मुळे शेतकरी तर त्रस्त झालाच आहे पण त्या वर अगोदर फेडलेल्या कर्जाचा डोंगर पुन्हा डोक्यावर आलं आहे. बी बियानाचा सुद्धा खर्च निगला नाही.शेतकरी माय बापाच्या तोंडाशी आले ला घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतला आहे.अतिश्य वाईट असुन दुदैवी आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी महापूर अशा निसर्गाच्या लहरींमुळे शेतकरी राजा खूप चितेत आहे. शेतकरी राजा शेतामध्ये राब राब राबून जिवाची रान करून राबतो आणि शेवटी त्यांची अशी परिस्थिती खूप कठीण आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी शेतात कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, ऊस, हे पिके चांगली आली होती परंतु अतिवृष्टी पावसामुळे हे सर्व पिके वायला गेली असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने सर्व पिकाची नासाडी झाली आहे.
त्या मुळे सरकार ने लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि नुकसान भरपाई करावी .अन्यथा या कर्ज च्या डोंगरखाली शेतकरी दबून जाईन हे सरकार ने लक्षात ग्यावे.
अन्यथा सरकार यास जबाबदार राहीन.प्रति हेक्टरी नुकसान भरपाई देऊन शेतकरी माय बापास धीर द्यावा.पंचनाम्यात वेळ न वाया घालवता सरसकट भरीव अनुदान द्यावे …?
जर सरकारला शेतकऱ्याच्या हाल अपेष्टा नसतील होऊ द्यायच्या तर लवकरात लवकर अधिकाऱ्यांना कामा ला लावले पाहिजे.शेतकरी हा स्वतंत्र स्वावलंबी भारताचा मूळ खांब आहे हा खांब खासळता कामा नये अन्यथा उपासमारीची वेळ येईन.
भलेही जग कितीही पुढे जाऊ द्या की डिजिटल होऊ द्या पण आज ही भाकरी ही शेतकऱ्याच्या शेतातल्या धाण्यामुळेच होते “ती काही गूगल वर किंवा डिजिटल बनत नसती.
जग कितीही डिजिटल झालं तरी शेतकरी हा महत्वाचा घटक होता आहे आणि असणार. त्या साठी अगोदर शेतकऱ्याला जगवा व सरकार ने आणि नंतर इतर. शेतकऱ्याच्या शेतात जर कापूस पिकला नाही तर ” नेते लोक” तुम्ही कॉटन किंग असे ब्रॅण्डेड कपडे घालू शकता नाही.त्या साठी अगोदर शेतकऱ्याला झिजावं लागतं आणि मग तुम्ही ब्रँडेड कपडे घालतात त्या साठी सरकार ने “खऱ्या ब्रँड ” ला जपलं पाहिजे. आणि हा ब्रँड जर जपायचा असेल तर तुम्ही शेतकऱयांची नुकसान भरपाई सरकार ने करावी. अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष प्रदिप झोडगे यांनी केली आहे