30 सप्टेंबर रोजी कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाचे पुणे येथे धरणे आंदोलन

17

🔹कास्ट्राईब शिक्षक आघाडी चे राज्य महासचिव गौतम कांबळे यांची माहिती

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.29सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दिनांक 30 /9 / 2020 रोजी श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या मार्गदर्शनानुसार एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . हे धरणे आंदोलन शारीरिक अंतर राखून व covid-19 संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात येणार आहे .

पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
राज्यात covid-19 संबंधीच्या कामकाजात राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना अनेक कामे देण्यात आली आहेत .त्यामध्ये तपासणी नाक्यावर ड्युटी करणे .स्वस्त धान्य दुकानावर निरीक्षक म्हणून काम करणे . कोवीड केअर सेंटरमध्ये काम करणे .कोरोना आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे .त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे .ऑक्सिजन लेवल तपासणे इत्यादी कामे देण्यात आलेली आहेत . परंतू ही कामे सोपवताना शिक्षकांना या संबंधितचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते परंतु असे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही .शिक्षकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही .कोरोणापासुन बचाव होण्यासाठी आवश्यक असलेले मास्क ,सॅनिटायझर, हॅन्डग्लोज व फेसशील्ड देणे आवश्यक होते. 

पुरवण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होते . साहित्य दिल्याचा आव आणला परंतू त्याच्या दर्जाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले .याचा परिणाम म्हणून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुणे जिल्ह्यातील चार शिक्षक व दोन परिचर मृत्युमुखी पडले .त्यांचे संसार उघड्यावर आले .याप्रकाराला श्री . भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात यावे .
इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या श्री सोपान कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी .त्यांना योग्य उपचार करण्यात आले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू झालेला आहे .या घटनेला तेथील covid-19 सनियंत्रण अधिकारी व इतर प्रमुख अधिकारी जबाबदार आहेत .त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . शासनाने राज्यातील शिक्षकांना covid-19 ची कामे देताना सुरक्षेच्या ठोस अशा कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत .त्यामुळे अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्यांचा संसार उघड्यावर पडला .मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना जाहीर केलेली विमा रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही .ती त्वरित देण्यात यावी . विमासुरक्षा योजनेची मुदत 30 सप्टेंबर 2020 रोजी संपत आहे . त्याची मुदत शासनाने वाढवावी . covid-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर त्वरित नोकरी देण्यात यावी .शासनाने जाहीर केलेले 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जिल्हा परिषद पुणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली 50 लाखाची मदत शिक्षक तसेच इतर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या .कुटुंबातील वारसाला त्वरित देण्यात यावी .

माझे कुटुंब माझे आरोग्य या योजनेतून शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून राज्य शासनाने वगळले आहे .तरीही स्थानिक अधिकारी जबरदस्तीने सर्वेक्षणाचे काम देतात .हे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये .

अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना बढतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्काळ आरक्षण लागू करावे .तसेच सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केससाठी तज्ञ वकिलाची नेमणूक करावी .

मा .बच्चुभाऊ कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी .

वरील मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती मा . राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती .या निवेदनाच्या प्रती मा . मुख्यमंत्री, मा . उपमुख्यमंत्री,मा .शालेय शिक्षण मंत्री, मा .आमदार राहुलदादा कुल, मा . मुख्य सचिव महाराष्ट्र शासन , राज्याचे मा .पोलीस महासंचालक , मा .जिल्हाधिकारी पुणे, मा .मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना देण्यात आल्या होत्या .परंतु शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हे धरणे आंदोलन करावे लागत आहे .covid-19 च्या काळात अनेक शिक्षक कर्मचारी अधिकारी यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत .व भविष्यात ही वेळ कोणावरही येऊ नये यासाठी राज्य सरकारांनी योग्य खबरदारी घ्यावी . आणि वरील मागण्यांची पूर्तता करावी यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती श्री . गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांनी दिली .यावेळी श्री दादा डाळिंबे ,श्री चंद्रकांत सलवदे ,श्री विनायक कांबळे , श्री शंकर घोडे ,श्री सुनील रुपनवर ,श्री जयवंत पवार व श्री विजय जाधव इत्यादी जिल्ह्याचे पदाधिकारी व अनेक तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते.