शासन मार्फत मिळणाऱ्या निधीचा गैरवापर सरपंच व ग्रामसेवकाला निलंबित करा – आरीफ शेख

  42

  ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

  जिवती(दि.29सप्टेंबर):- जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खडकी ( हिरापूर ) ग्रामपंचायत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहे, शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी निधी ग्रामपंचायतला देण्यात येते त्या निधीचा वापर ग्राम विकासासाठी न करता सरपंच व ग्रामसेवक स्वता:चा विकास करताना दिसत आहेत.

  चौदा वित्त आयोगाच्या निधी मधून ग्रामपंचायत खडकी ( हिरापूर ) च्या सरपंच बाई अमृतवर्षा पिल्लेवाड यांनी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी स्वताच्या नावाने ग्रामपंचायतीच्या धनादेशाद्वारे १४००० हजार रुपये उचल केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

  ग्रामपंचायत अंतर्गत विविध निधीतून विकासाची कामे सुरू असुन.हे विकासाचे कामे स्वता सरपंच व सदस्य करीत असून या कामात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने विकासाला खीळ बसली आहे.

  १४०००हजार रुपयाचा धनादेशाची व निकृष्ट दर्जाचा कामाची ग्रामपंचायत कायाद्या अंतर्गत विभागीय चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक यांना कायदेशीर कारवाई करून निलंबित करा अश्या मागणीचे निवेदन संर्वग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना भ्रष्टाचार निवारण समितीचे जिवती तालुकाध्यक्ष आरीफ शेख यांनी दिला.