✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.29सप्टेंबर):-कोरोनाला जिल्ह्याच्या सिमेवर रोखण्यासाठी जिवाची बाजी लावणार्‍या अनेक पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उतरणार्‍या अनेक पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाने घेरले.युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले चार पोलीस कर्मचारी काल पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामधील एका ५५ वर्षीय पोलीस हवालदाराचा आज
उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे बीड पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुळ पाटोदा तालुक्यातील हवालदार युसुफवडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.काल त्यांच्यासह इतर काही लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यामध्येबचार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर लोखंडी सावरगाव येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. आज अडीच वाजगता यातील ५५ वर्षीय पोलीस हवालदार यांचे निधन झाले. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED