अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करा अन्यथा आंदोलन करणार

35

🔺 आरीफ शेख (डोंगरे) यांनी दिला इशारा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.30सप्टेंबर):- तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, साजा पुनागुडा, पाटण, नंदप्पा या साज्यात येणारे शेतकऱ्यांचे शेतीतले कापूस, सोयाबीन,ज्वारी,तूर इत्यादी उभे पिक भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी २५००० हजार रुपये मदत करण्यात यावी.

अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन देताना काॅग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिवती तालुकाध्यक्ष आरीफ शेख (डोंगरे ) संभाजी नामपल्ले, ताजुददीन शेख, जयदेव आत्राम,ईसरु मेश्राम, रमेश राठोड, जमालु शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.