मनीषा वाल्मिकी च्या नराधमांना चौकात फाशी द्या अन्यथा उत्तर मुंबईत रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करणार – सुरेश वाघमारे

21

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.30सप्टेंबर):-उत्तर प्रदेश येथील हातरस येथील वाल्मिकी समाजातील 18वर्षीय मनीषा वाल्मिकी या मुलीची अत्यन्त क्रूर मानवतेला काळिमा फासणारी घटना मुख्यमंत्री योगी च्या राज्यात घडते व राज्याचा जबाबदार व्यक्ती मुख्यमंत्री काहीही ब्र शब्द पण काढत नाही.

या जातीयवादी मानसिकतेच्या मुख्यमंत्री चा भिम आर्मी तीव्र शब्दात निषेध करत असून तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून त्या चौघा जनाला भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून समाजात अशी हिम्मत कुणी करणार नाही व या देशात महिलांचा सन्मान राखला जाईल व भविष्यात कुणी ही असे कृत्य करण्यास धजावणार नाही या करिता आरोपी नराधमांना तात्काळ फाशी द्या अन्यथा उत्तर मुंबई जिल्ह्यात ठिक ठिकाणी रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिम आर्मी भारत एकता मिशन चे जिल्हाप्रमुख सुरेश वाघमारे यांनी दिला.

असून भिम आर्मी चीफ भाई चंद्रशेखर आजाद यांना झालेली अटक ही आम्ही भिम सैनिक कदापिही खपून घेणार नाही जर मोदी सरकार न्याय मागणाऱ्याला जेल मध्ये टाकत असेलअभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेत असेल तर भिम आर्मी .महाराष्ट्र प्रदेश प्रमुख नेहा ताई शिंदे व मुंबई प्रदेश प्रमुख दीपक हनवते यांच्या मार्गदर्शना खाली उत्तर मुंबई जिल्ह्यात रास्ता रोको करत जेलभरो आंदोलन सुद्धा करेल याची सरकारने दखल घ्यावी असा सज्जड इशारा उत्तर मुंबई जिल्हाप्रमुख सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमा द्वारे केंद्र सरकार ला दिला आहे.