✒️इचलकरंजी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

इचलकरंजी(दि.30सप्टेंबर):- महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज निर्मिती, पारेषण, वितरण व ग्राहक हक्क या क्षेत्रातील अभ्यासक आणि गेली २० वर्षे सातत्याने वीज ग्राहकांच्या हक्कासाठी सर्व सनदशीर मार्गानी लढा देणारे वीजतज्ञ मा. प्रताप होगाडे यांनी राज्यातील वीज ग्राहकांच्या माहितीसाठी, हितासाठी व जागृतीसाठी ” वीज ग्राहकांचे हक्क ” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म. गांधी जयंती दिनी दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक ४ वाजता समाजवादी प्रबोधिनी, रा. छ. शाहू महाराज पुतळ्याजवळ, इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर, मुंबई या संघटनेचे वरीष्ठ उपाध्यक्ष मा. ललित गांधी, कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लॉकडाऊन विषयक निर्बंधांमुळे सर्व शासकीय सूचनांचे पालन करून मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 

          सर्वसामान्य घरगुती, व्यावसायिक, शेतकरी व औद्योगिक या सर्व वीज ग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्ये व चळवळीचे ज्ञान व्हावे, त्यांचे हक्क प्रस्थापित व्हावेत व त्यांना लढ्याची प्रेरणा मिळावी या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकाचे वितरण व विक्री कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी व दि. ३ ऑक्टोबर पासून वीज ग्राहक संघटना कार्यालय, महासत्ता चौक, इचलकरंजी येथे सुरु राहील. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यात येईल अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक वीज ग्राहक संघटनेचे उपाध्यक्ष विजय जगताप व सचिव जाविद मोमीन यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED