नाभिक समाजावरील अन्याय त्वरित थांबवा – ब्रम्हपुरी नाभिक बांधवांचा ईशारा

8

🔸अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.30 सप्टेंबर):- नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे झालेल्या सलून व्यावसायिकाची हत्येच्या निषेधातंर दिनांक २९/०९/२९२० ला नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे मा. उपविभागीय अधिकारी मॅडम ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व कुटुंबाला आर्थिक मदत व समाजाला एट्रोसिटी चे संरक्षण मिळावे म्हणून निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षा पासुन नाभिक समाजावर अन्याय होत आलेले आहेत, मात्र सरकार कोणतीही असो…! पण नाभिक समाज अल्पसंख्याक असल्याने नेहमीच दुर्लक्ष होत आलेला आहे.
आता मात्र या अन्यायावर सरकारने जर विशेष समिती नेमून समाजाला न्याय मिळवू दिला नाही तर, नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे तिव्र आंदोलन करू असा इशारा सचिव लक्ष्मीकांत फ़ुलबांधे यांनी केला.

यावेऴी समाजाचे अध्यक्ष विलास सुर्यवंशी, अजय खडसिंगे, मयुर प्रदीप मेश्राम, लक्ष्मण मेश्राम, विलास दाणे,विनोद मेश्राम,श्रावण येडने, रामा मेश्राम, पितांबर फ़ुलबांधे आदी उपस्थित होते.