श्रीराम पाटील पवार यांची प्रहार दिव्यांग संघटना नांदेडच्या जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी

7

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.30सप्टेंबर);-श्रीराम पाटील पवार वडगावकर यांची प्रहार दिव्यांग संघटनेत जवळ-जवळ एक वर्षापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती पण त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संघटनेची बांधणी, दिव्यांगाशी सुसंवाद, या बाबींना तिलांजली देत संघटनेच्या कोणत्याच बैठकीला हजर न राहणे, दिव्यांगांना व वरिष्ठांना उद्धट बोलणे आणि संघटनेच्या विरुद्ध कारवाया करणे इत्यादी प्रकार चालवले होते.

म्हणून काल 29 सप्टेंबर रोजी च्या पत्रात नांदेड जिल्हा प्रमुख श्रीयुत विठ्ठलरावजी मंगनाळे साहेबांनी जिल्हाध्यक्ष श्रीराम पवार यांना डच्चू दिल्याचे कळवले व जिल्ह्यातील दिव्यांगा ने पण श्रीयुत पवारांचा व प्रहार संघटनेचा कसलाही संबंध नाही तरी दिव्यांग बांधवांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपले दैवत मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू च्या दिशा निर्देशानुसार संघटनेला बळकटी देण्यासाठी अपसा आपसातील मतभेद बाजूला सारून प्रहारच्या झेंड्याखाली एकत्र राहण्याचे आवाहन करून पूर्वीच्या तथाकथित अध्यक्षाला पदावरून हकालपट्टी केल्याचे आमच्या प्रतिनिधीला प्रेसनोट द्वारे कळवले.