ऊसतोड कामगारांच्या संपाच्या आड शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका – दत्ता वाकसे

  57

  ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

  बीड(दि.30सप्टेंबर):-गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने थैमान घातले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला हा खूप मोठ्या प्रमाणात पडला आहे त्याचबरोबर जमीनउधवस्त झाला आहे त्यामुळे शेतकरी आता खरोखरच मेटाकुटीला आलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या संपाच्या आड शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.

  पुढे दिलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे की गेल्या आठवडाभरापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामध्येच शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या उसाचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उस पडून जमीनउध्वस्त झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उसाचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे तात्काळ कारखाने चालू झाले नाही तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे ऊसतोड कामगाराच्या आड राजकारण करणे थांबवावे सध्या शेतकरी हा खूप मोठ्या अडचणी मध्ये आहे त्यामुळे संप तात्काळ मागे घेऊन सहकार्य करावे असे देखील वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

  —————–चौकट————-
  गेल्या काही दिवसापासून शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणी मध्ये सापडला आहे शेतकऱ्याच्या शेतातील उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात जमीनउध्वस्त झाल्यामुळे नुकसान झाले आहे त्यामध्ये राजकीय नेत्यांनी ऊसतोड कामगारांच्या मागण्यासाठी संपाची हाक दिली आहे परंतु यावेळी शेतकऱ्यांचा देखील संपकर्त्यांनी त्यांनी विचार करावा संपामुळे कारखाने चालू झाले.

  नाही तर शेतकऱ्यांच्या शेतातील पडलेला पाऊस आणि त्यामध्येच उसाला उणी नावाचा रोगाचे प्रमाण जास्त लागल्यामुळे ऊस खूप मोठ्या प्रमाणात वाळत आहे त्यामुळे तात्काळ कारखाने चालू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे देखील वाकसे यांनी म्हटले आहे