मुंबई प्रमाणे लांब आणि उंच उड्डाणपूल पुणे शिक्रापुर रस्त्यावर करावे

  90

  ?आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांची मागणी

  ✒️पूणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  पुणे(दि.30सप्टेंबर):-पुणे शिरूर महामार्गाच्या पुणे ते शिक्रापूर वाहतूक कोंडी वरील सर्वांगीण उपाय योजनेसाठी अडथळा विरहित रस्ता (सीमलेस ट्राफिक) करावा.

  त्यासाठी पुणे ते शिक्रापूर दरम्यानचा लॉन्ग प्लाय ओव्हर प्लाय उडान पुलाचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करावा असी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

  या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांनी केले आहे..