🔹राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या आंदोलनाला यश

✒️संतोष मडावी(विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

जीवती(दि.30 सप्टेंबर):- तालुक्यातील भारतीय स्टेट बँक पाटण शाखेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला मात्र चालू हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे जून महिन्यापासून तीनशे ते चारशे प्रकरण कर्जवाटप पासून वंचित होते अनेक शेतकरी कर्ज मागणी अर्ज बँकेला सादर करून सुद्धा हंगामात वेळेवर कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे व खतांची जुळवाजुळव केली बँकेने वेळीचकर्ज उपलब्ध न केल्यानेशेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला संतप्त शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीद अली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास राठोड नगर उपाध्यक्ष शरद जोगी वाघु उईके रफिक निजामी पाटण पोलीस स्टेशन येथे धडक देऊन बैठाआंदोलन केले.

ठाणेदार चौधरी यांनी बँक व्यवस्थापक जावेश कुस्कु यांना पाचारण करून आंदोलनकर्त्या सह पोलीस स्टेशन मध्ये चर्चा घडवून आणली बँकेमध्ये शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रकरण निकाली काढून आठ ते दहा दिवसात सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये बँकेकडून सहकार्य करण्यात येईल असा शब्द दिला काही प्रकरणांमध्ये बनावटी सातबारा नादेय प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने याची खातरजमा करण्यासाठी पत्रव्यवहार केला मात्र संबंधितांकडून माहिती उपलब्ध होत नसल्याने कर्जवाटपात विलंब झाला असे मान्य केले शाखेत कर्मचारी दोनच असल्यामुळे विलंब होत असल्याची माहिती दिली काही शेतकऱ्यांना नक्कीच त्रास झाला यापुढे दिवस निश्‍चित करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल अशी माहिती दिली काही दलालांचा वाटपात हस्तक्षेप झाल्याची माहिती मला मिळाली बँकेचा कोणताही कर्मचारी पैसे घेऊन कर्जवाटप केले हा आरोप काही दलालामार्फत पसरविल्या गेला आहे.

आपल्या मागणीनुसार खेड शेतकऱ्यांशी संवाद करण्यात येईल गरजूला कर्ज देण्यात येईल दलालांमार्फत शेतकऱ्यांनी संपर्क करू नये असेही म्हणाले व्यापक चर्चेअंती हे आंदोलन मागे घेण्यात आला बँकेत व्यवस्थापक यांनी संपूर्ण कर्ज प्रकरण निकाली काढ न्या बद्दल शेतकऱ्यांना आश्वस्तकेले बँक व्यवस्थापक यांनी बँकेत झालेल्या चर्चेत बनावटी सातबारा व एकाच प्रकरणात वेगवेगळे अहवाल तलाठी गट सचिव हे देत असल्याने बँकेला कामाचा बोजा वाढला याबाबत काही तुने पोलिसाकडे दिले आहे पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासन दिल्याने समाधान व्यक्त करून आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED