आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन

25

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.30सप्टेंबर):-आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होवून एकसंघ व्हावी म्हणून म्हणून आपले घर दार आणि कुटूंबाची पर्वा न करता आपले आयुष्य पणास लावणारे, थोर अभ्यासक आणि आंबेडकरी तत्वज्ञानाचे भाष्यकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित समता सैनिक दलाचे वरिष्ठ मार्गदर्शक अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर याचे आज बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १० : १५ वाजता दुखः द निधन झाले.

अॅड. विमलसूर्य चिमणकर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९५५ चा असून विद्यार्थी जीवनापासूनच ते आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच रिपब्लिकन पार्टीच्या एकत्रिकरणाकरीता त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेत. तसेच एकंदरच आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या विचारांवर अधिष्ठीत व्हावी म्हूणून त्यांची धडपड असायची.

त्यांनी ‘द्वितीय महायुद्ध आणि डाॅ. आंबेडकर, रिडल्स नंतरचा जातीय वणवा, दोन सूर्य दोन घुबडे, सूर्याकूर, मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद या महत्त्वांच्या पुस्तकाबरोबर नामांतर वा सत्तांतर, खैरलांजी एक सवाल, वेटिंग फार व्हिसा, साकेत कि अयोध्या? इत्यादी पुस्तिका प्रकाशित केल्यात.