बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल – अँड. प्रकाश आंबेडकर

31

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

पाटणा(दि.३०सप्टेंबर):- बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही.

लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाइल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ते पुढे म्हणाले, धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.