भिम आर्मी चे जिल्हा उपप्रमुख बोरकर यांचे अन्न त्याग उपोषण सुरु

  38

  ?घनकचरा व्यवस्थापन च्या ठेक्यात भ्रष्टाचार प्रकरण- अनेक राजकीय पक्षाचा पाठींबा जाहीर

  ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

  गडचांदूर(दि.30सप्टेंबर):- गडचांदूर औद्योगिक नगरी येथील नगर परिषद ने घनकचरा व्यवस्थापन चा ठेका मागील वर्षी देण्यात आला होता यात ठेक्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भिम आर्मी चे जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर यांनी एका निवेदनातून केली होती. परंतु या बाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नाही त्यामुळे तीस सप्टेंबर 2020 ला दुपारी बारा वाजता पासून अन्न त्याग उपोषण करणार असल्याचे पञ तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले होते त्या अनुषंगाने आज मदन बोरकर यांनी नगर परिषद समोर अन्न त्याग उपोषणाला सुरवात केली आहे. या उपोषणाला अनेक राजकीय पक्षाचा पाठींबा असून स्थानिक सामाजिक संघटना चा सुद्धा पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.

  नगरपरिषद गडचांदूर येथील मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, आरोग्य विभाग प्रमुख यांनी संगनमत करून खोट्या बिलांची रक्कम उचलून नगरपरिषदेच्या फंडाची अफरातफर केल्याचा आरोप करत येत्या २९ सप्टेंबर २०२०पर्यंत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ,दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा अशी मागणी बोरकर यांनी एका निवेदनातून केली होती जर मला योग्य न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव मला लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे त्या निवेदनातून वकेले होते. त्या अनुषंगाने आज मदन बोरकर यांनी नगर परिषद समोर अन्न त्याग आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे.

  यामुळे आता येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकरण पेटणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
  शहरातील कचरा उचल करणे, घंटागाडीद्वारे घरोघरी ओला-सुखा कचरा गोळा करणे,त्याचे विलगीककरण करणे, सार्वजनिक शौचालय साफसफाई करणे अशा विविध स्वच्छतेच्या कामांचा डीपीआर मंजूर करून निविदाही काढण्यात आल्या. सदरचे काम चंद्रपूर येथील “युवक कल्याण सुशिक्षीत बेरोजगार संस्थेला मागील वर्षी देण्यात आले. न.प.च्या हातगाडी १०,नवीन ६ टाटा एस गाड्या त्याच्या स्वाधीन करण्यात आले.काही महिने काम व्यवस्थीतरित्या सुरू होते.त्यानंतर मागील ६,७ महिन्यांपासून न.प.ने दिलेल्या हात गाड्या पूर्णपणे बंद केल्या व ६ टाटा एस गाड्याद्वारे काही मोजक्या भागातला कचरा उचलला जातो. ओला-सुखा कचरा विलगीकरण केल्या जात नाही. कमी कर्मचारी लावून काम चालवतात, शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.डेंग्यू मलेरीया सारख्या रोगांचे रुग्ण वाढत आहे. नुकतेच डेंग्यूमुळे 2 निष्पाप मुलींचे बळी गेले आहे. सदर कंत्राटदाराकडून करारनाम्या नुसार कुठलेही काम होत नसल्याची तक्रारी होत असतानाही मुख्याधिकारी यांनी कोणतीही दंडात्मक कारवाई न करता उलट त्याचे बिल देण्यात आले.आणि आश्चर्यची बाब म्हणजे याचे कंत्राट सुद्धा सुरू ठेवण्यात आले.करारनाम्या नुसार त्याच्याकडून काम न घेता, परवाना काळ्या यादीत न टाकता कंत्राटदारा सोबत संगनमत करून करारनाम्यातील अटी व शर्तींना तिलांजली देत खोटे बिल तयार करून पूर्ण बिल कंत्राटदाराला देवून स्वतःचा स्वार्थ साधला.

  असा आरोप बोरकर यांनी निवेदनातून केला आहे.निवेदनाची प्रत नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, आयुक्त तथा संचालक नगरपालिका संचानालय मुंबई,उपसंचालक नगरपालिका संचानालय नागपूर, माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुंनगटीवार, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अँड.संजय धोटे यांना मेलद्वारे तर तहसीलदार कोरपना, गडचांदूर न.प.चे समस्त विरोधी पक्ष नगरसेवक, प्रत्यक्ष भेटून देण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी दिली आहे.

  आता दिलेल्या मुदतीत सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही त्यामुळे बोरकर यांना अन्नत्याग उपोषण करावे लागले आहे .या आंदोलना कडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे रफीक निझामी, भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे, शिवाजी सेलोकार, गडचांदूर संघर्ष समितीचे अशोककुमार उमरे, हेमंतभाउ वैरागडे. हंसराज चौधरी, सुरेद्र कोमावार यांनी उपोषण स्थळाला भेटी दिल्या आहे.आता जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.