गायरानधारकांच्या विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने केज तहसिल कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

33

🔸गायरान धारकांच्या पिकांचे तात्काळ पिक पंचनामे करून १ ई ला नोंदी घ्या

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.३०सप्टेंबर):-केज तालुक्यातील लाडेगाव सह तालुक्यातील सर्व गायरान धारकांसह वंचित बहुजन आघाडी चर्या वतीने आज केज तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी अमर्यादित काळासाठी धरणे आंदोलन धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मौजे लाडेगाव येथील गावरान धारकांसहित तालुक्यातील विविध गावांतील गायरान धारक उपस्थित होते.

गायरान धारकांच्या मुख्य मागण्या म्हणजे१) गेली पंचवीस ते तीस वर्षे आम्ही मेहनत करून गायरान जमिणी कसत आहोत व वहिती करून विविध पिके घेऊन उपजिविका भागवत आहोत त्या जमिनीवर गावातील ( लाडेगांव) येथील सरंजामी वृत्तीचे लोक वनीकरण करु पहातेत ते होऊ नये.२) आम्ही कसत असलेल्या गायरान जमिनीवरील चालु वर्षातील पिकांचे पिकपंचनामे तात्काळ करुन १ई ला नोंद घ्यावी या प्रमुख मागणीसाठी आज लाडेगांव येथील गायरान धारकांसह वंचित बहुजन आघाडी केज तालुका यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडी बीड (पुर्व) जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे,राज्य महासचिव भीमराव आबा दळे,सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते प्रशांतजी बोराडे,सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष अजयजी साबळे, जिल्हा महासचिव सुदेशजी सिरसाठ, जिल्हा महासचिव गोरख गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा नेते अक्षय बचुटे गोटेगांवकर, सुनिल गायसमुद्रे,धम्मानंद कासारे,अजय भांगे,बाबा मस्के, धनराज सोणवणे,गंगाधर सिरसाट, केज तालुकाअध्यक्ष बाबासाहेब मस्के, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय तेलंग, पुरोगामी पत्रकार संघ केज शहराध्यक्ष रणजित घाडगे ( रिपब्लिकन सेना पक्ष) ,केज तालुका सचिव उत्तम वाघमारे,केज तालुका सचिव नवनाथ पौळ, तालुका विधी सल्लागार अॅड.सतिश मस्के,केज तालुका संघटक विशाल धिरे यांच्यासह लाडेगांव व तालुक्यातील सर्व गायरान धारक उपस्थित होते.

सदरील धरणे आंदोलनांच्या निमित्ताने तहसीलदार यांना आदरणीय भिमराव दळे,अनिल भाऊ डोंगरे, शैलेश भाऊ कांबळे यांनी भेटून प्रत्यक्षरित्या गायरान धारकांच्या मागण्यांविषयी चर्चा करुन तहसिलदार यांच्याकडून लेखी आश्र्वासन घेऊन सदरील धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.