भटके विमुक्त आदिवासी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी

  42

  ?अन्यथा राज्य भर आंदोलन करणार – अशोक जाधव धनगांवकर

  ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मुंबई(दि.30सप्टेंबर):-भटके विमुक्त आदिवासी ओबीसी एसबिसी दलित बहुजन समाजाच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे कारण देशामध्ये असलेल्या सर्व जाति समुहाची लोकसंख्या किती आहे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत केलेल्या तरतुदी नुसार कलम 340 व341 अन्वयेअसलेल्या एसी, एसटी,ओबीसी प्रर्वगातील समुहाची लोकसंख्या किती आहे हे कळेल व केंद्र व राज्य सरकार मध्ये असलेले आरक्षण यात किती तफावत आहे हे कळेल या देशामध्ये बहुसंख्येने असलेल्या समाजावर जो अन्याय ईथल्या सर्व राजकीय पक्षांनी सुरु केला आहे हे सत्य परिस्थिती लक्षात येईल. केंद्र सरकारने जो खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे तो चुकीचा आहे.

  गरीब समाजातील सर्व जाती जमाती साठी घातक असुन भविष्यात देशात अराजकता माजण्याची भिती निर्माण झाली आहे .भविष्यात सरकारी नोकऱ्यां कमी होतील किंवा अपेक्षित तथा हक्क वंचित समाजाच्या नोकऱ्या कायमस्वरूपी नष्ट करण्याचे कट कारस्थान सुरू आहे,संविधान पुर्वकाळातला गुलाम समाज निर्माण करण्याचे हि षडयंत्र सुरू आहे यासाठी दलित आदिवासी भटके विमुक्त ओबीसी एसबिसी अशा सगळ्या घटकांनी दुरावा सोडून सतर्क आणी जागे राहण्याची गरज आहे.आपल सामाजिक कर्तव्य म्हणून या सगळ्या कार्यकर्ते यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. नाही तर पुढील काळात गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना कायमस्वरूपी बंद होईल, शेकडो शेतकरी आत्महत्या करतील,माणसाला माणूस म्हणून जगता येणे मुश्कील होईल हे टाळण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या वतीने सर्व समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार कडे मागणी करण्यात येणार असुन त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर आपआपल्या वेशभूषेत, पशुप्राण्यासह , झोपलेल्या सरकारला जागे करुन जवाब विचारणाऱ्या अनोख्या क्रूती कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे.

  गरच पडल्यास दिल्ली येथील जनंतर मंतर येथे आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लाखो लोकांच्या सह रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे यासाठी लवकरच राज्य व्यापी दौरा आयोजित करण्यात येणार असुन महाराष्ट्रातील सर्व जाती जमाती धर्माच्या संघटनेच्या पदाधिकारी यांच्या शी चर्चा करून भव्य आंदोलन संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकर यांच्या नेतृत्वाखाली छेढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनेच्या नेते मंडळी यांनी एकत्र यावे असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख गोरख गव्हाणे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप वाघमारे, प्रदेश कार्याध्यक्ष मेजर धनसिंग गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजयभाऊ चव्हाण,गोंधळी समाजाचे नेते रामदास कटक, विदर्भ प्रदेश संघटक तथा तिरमल समाजाचे नेते कैलास वरेकर, बेलदार समाजाचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रोहिदास चव्हाण, वासुदेव समाजाचे नेते अनिल चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनिल धमने, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश वाघचौरे, युवा नेते झेंडू पवार, महिला प्रदेश कार्याध्यक्ष जानवी मेस्त्री,महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ सुरेश शिन्दे,कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष सोमनाथ धायडे, अमरावती विभागीय संघटक भानुदास पवार,मराठवाडा विभागीय संघटक तथा तिरमल समाजाचे नेते राम भिंगारे,ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रींकात सांगळे,खांन्देश विभागाचे नेते डॉ अमोल सांगळे,कोकण विभागीय कार्याध्यक्ष संजय पेंडर, उत्तर महाराष्ट्र नेते विठ्ठल गायकवाड,पच्छिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश शिन्दे ,मुंबई विभागीय* सरचिटणीस नारायण भिंगारे, मुंबई विभागीय संघटक विजय कांबळे ,यांनी केले आहे.
  .