पुन्हा पुनर्नियुक्ती द्या – उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे

10

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.30सप्टेंबर):-“उमेद” अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यातील 150 कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नसल्याने कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
दरवर्षी पुनर्नियुक्ती देण्यात येते मात्र यावर्षी पुनर्नियुक्ती देण्यात आली नसल्याने राज्यातील साडेतीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे.

यातील 150 कर्मचारी बीडचे आहेत. आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती नाहीच पाहिजे मात्र दरवर्षीप्रमाणे पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी काचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत शासन परिपत्रक काढणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असा पवित्रा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.