हिमायतनगर तहसिलदार यांनी पंधरा दिवसात न्याय न दिल्यास दिव्याग,वृध्द,निराधार हे तहसिलदार यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करणार

25

🔸संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

हिमायतनगर(दि.1ऑक्टोबर):- दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग संघटनेचे शिष्टमंडळ मा तहसिलदार साहेब यांच्याशी पाच विषयावर चर्चा करण्यात आली दिव्यांग वृध्द निराधार यांचे थकित अनुदान का देण्यात आले नाही ते अनुदान चार दिवसांत त्यांच्या खात्यात मिळेल असे आश्वासन दिले.

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार साहेब यांना दिव्यांग वृध्द निराधार यांच्या पाच प्रमुख मागण्या साठि पंधरा दिवसात त्यांचा हक्क द्या नसेल तर प्रत्येक तालुक्यात झोपलेल्या प्रशासन यांना जागे करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष डाकोरे पाटिल यांच्या आदेशानुसार मदुखेड तहसिलदार साहेब यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे दिला इशारा
प्रशासन दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांना आधार देण्याऐवजी प्रशासन बेघर करित असुन शासन व वरिष्ठ अधिकारी अनेक लेखी आदेश देऊन त्यांची कनिष्ठ अधिकारी आदेशाला केराची टोपली दाखवत असल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार यांना केंद्र सरकारने दरमहा मिळणारे अनुदान तिन महिने दुप्पट एकरकमी खात्यात देण्याचे आदेश देऊन ते तर मिळालेच नाहि .पण नेहमी मिळणारे अनुदान चार महिन्या पासून मिळत नसल्यामुळे सर्व उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.

जागतिक संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना लाभ देण्याचे लेखि आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाही.अशा संकटकाळी भुकमारी होऊ नये म्हणून धान्य किट पुरवठा करण्याचे आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाही.संजय गांधी, ईतर योजनेत पाञ लाभार्थी निवड आठ ते दहा महिने होत नाही.निवड झालेल्या पाञ लाभार्थ्यांना मंजुरीनंतर सहा महिने अनुदान मिळत नाहि व नामंजूर किव्वा मंजुर झालेले कळविण्यात येत नाही.

दिव्यांग बांधवाना विनाअट अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना राषण कार्ड देऊन आधार द्यावा,संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीत दिव्यांग बांधवांना सदस्य यांची निवड शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि नसल्याने दिव्यांग वृध्द निराधार यांना उपासमारीने राहाण्याची वेळ आल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद दिव्यांग आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी नांदेड,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड,समाज कल्याण अधिकारी जि.प.नांदेड यांना तहसिलदार साहेब हिमायतनगर यांच्या मार्फत दिनदुबळ्या उपेक्षित दिव्यांग वृध्द निराधार यांना पंधरा दिवसांत न्याय देण्याचे आदेश देऊन द्यावा जर न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रश्नांसाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करण्यात येईल ही वेळ येऊ देऊ नये असे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र हिमायतनगर तालुकाचे शिष्टमंडळ संस्थापकअध्यक्ष चंपतराव डाकोरे .अशोक घायाळे,संदानंद गायकवाड, किसन रापेवाड, शिंदे शुभांगी, कोमल खंडू, ईत्यादी कार्यकर्त्यांनी दिला.