“जागतिक गांधी शांतता पुरस्कार_२०२०” साठी उदयकुमार सुरेश पगाडे यांच नाव घोषित

14

🔸विश्र्वस्तरावर “ग्लोबल गांधी पीस पुरस्कार_२०२०” चा खास आयोजन म.गांधी जयंतीच्या दिवशी

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.1ऑक्टोंबर):- स्वर्ण भारत परिवार यांच्या संचारित आंतरराष्ट्रीय युवा विकास कार्यक्रम आणि विश्व शांती पुरस्कार बोर्डाने, स्वर्ण भारत परिवार च्या राष्ट्रीय अध्यक्ष पीयुष पंडित यांच्या निर्दशनास व दिशा फाऊंडेशनच्या सहयोगाने भारताच्या युवा मामला आणि खेळ मंत्रालय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजिजू यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय युवा विकास आणि विश्व गांधी शांती पुरस्कार व शिखर संमेलन द्वारा मेल पाठवून निमंत्रित केले आहे.

विश्वातील कोणत्याही भागात , युवा विकास व विश्व शांती द्वारे कार्य करणाऱ्यांना स्वर्ण भारत परिवार २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी गूगल मिट द्वारे होणाऱ्या शिखर संमेलनात आमंत्रित करीत असतात, व विश्वातील 51 विशिष्ट योग्यता असणाऱ्या युवासाठी, “ग्लोबल गांधी पीस पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मधील सामाजिक क्षेत्रातील युवा नेतृत्व_उदयकुमार सुरेश पगाडे (वय_२६) यांच नाव घोषित करण्यात आल आहे. यांना २ ऑक्टोंबर ला “ग्लोबल गांधी पीस अवॉर्ड २०२०” हा जागतिक स्तरावरील शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार उदयकुमार पगाडे यांना अभिमानास्पद आहे. या आधी पण यांना अनेक राज्य, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे..म्हणूनच ब्रम्हपुरी मध्ये सर्वत्र यांचा कौतुक होत आहे..