हाथरस प्रकरणाचे पंतप्रधान यांना पाठविले निवेदन

  39

  🔹सीरसाळा पोलीस ठाण्याचे मार्फत स्वीकारले निवेदन

  ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

  परळी(दि.1ऑक्टोबर):- हाथरस व बलरामपूर ( राज्य उत्तर प्रदेश ) येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलीवंर झालेल्या अत्त्याचार/ बलत्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करुन कडक शासन करणे बाबतचे निवेदन सीरसाळा पोलीस ठाण्याचे मार्फत पंतप्रधान यांना पाठविण्यात आले .

  उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर ह्या दोन ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलीवंर जातीयवादी सडक्या माणसिकतेच्या लोकांनी अमानुष छळ करत बलत्कार केला आहे. दोन्ही ठिकाण च्या दोन्ही मुलींचा बलत्कार व मारहाणी मुळे ह्या घटना दरम्यान मृत्यू झाला आहे. हि घटना संबध देशा साठी, मानव जातीला कलंकीत करणारी आहे. यातील आरोपिंना तात्काळ अटक करुन त्यांना कडक शासन करावे व ह्या दोन्ही प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमीका संशयास्पद असल्याचे समजते आहे. म्हणून यांच्यावर देखील योग्य ती कार्यवाही करावी. ह्या घटनेचा आम्ही तीव्र ये निषेध व्यक्त करतो आहोत. असे निवेदनात नमूद आहे .

  यावेळी मिलिंद चोपडे धर्मा मेंडके माजेत इनामदार अतुल बडे आशीष कांबळे आदि उपस्थित होते.