✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.1ऑक्टोबर):- उत्तरप्रदेशच्या सरकारकडून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पोलीस यंत्रणा व प्रशासनाकडून धक्का बुक्की केली त्याचा जाहीर निषेध परळी काँग्रेस च्या कार्यकर्ते यांनी केला आहे. उत्तर प्रदेश मधील बलात्कार पीडित मुलीला भेटण्यासाठी स्वतः पायी चालत असताना पोलीस प्रशासनाकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली.

व प्रियंका गांधी सह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यावर लाठीचार्ज करून अटक करण्यात आली याचा परळी काँग्रेस च्या वतीने जाहीर निषेध काँग्रेसचे नेते वसंत मुंडे सह अनेक कार्यकर्त्यांनी केला .उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील दलित मुलगी मनीषा वाल्मिकी यांच्या वर चार नराधमांनी बलात्कार करून तिची जीभ कापून टाकली व तिला बेदम मारहाण करून बलात्कार केला होता आज मृत्यु पावली आहे.

या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी व काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बलात्कार पीडित मुलीच्या घरी पायी भेटण्यासाठी जात असताना पोलीस प्रशासनाकडून यूपी सरकार चे योगी मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून राहुल गांधी व प्रियांका गांधी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, या सर्व प्रकरणाची निपक्षपातीपणे तपासणी करून नराधमाला फाशी द्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की व कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे मारहाण करणाऱ्या सरकारला आम्ही जाहीर निषेध करतोत.

यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती काँग्रेसचा विजय स्तंभ मोंढा विभाग येथे 10 वाजता सकाळी साजरी झाल्यानंतर तहसीलदार परळी-वैद्यनाथ यांना यूपी सरकारचा निषेध करण्यासाठी निवेदन देतील या बैठकीस काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग गणपत आप्पा कोरे परळी शहर अध्यक्ष ॲड अनिल मुंडे परळी तालुका अध्यक्ष विश्वनाथ गायकवाड प्रकाश देशमुख ॲड संजय लोंढे सय्यद अल्ताफ तांदळे लहू दास राम घाटे महिला अध्यक्ष आशाताई कोरे तालुका अध्यक्ष सुनिता मुंडे प्रा खोसे हत्ती हंबीरे सर गुलाबराव देवकर सिकंदर भाई जब्बर शेठ सचिन मुंडे रामलिंग नावंदे राहुल भोकरे इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश च्या सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED