रयत शेतकरी संघटना बिड जिल्हा महिला अध्यक्ष पदावर सविता दोडके यांची निवड

20

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बिड(दि.1ऑक्टोबर):-अॅड न्यायमूर्ती रविप्रकाशजी ऊर्फ बापुसाहेब देशमुख साहेब रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा प्रमुख सुनिल ठोसर यांच्या नेतृत्वाखाली सविता नवनाथ दोडके यांची रयत शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख व सविता धोंडगे यांची महिला आघाडी तालुका प्रमुख आणि नसीमा मोमीन अय्युब यांची बीड शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे..

आपल्या हातून शोषित पीडित रुग्ण दींव्यांग आत्महत्या ग्रस्त समाजातील विविध क्षेत्रातील तळागाळातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळे कायम सर्वोतोपरी सहकार्य करावे सर्व समावेशक जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो रयत शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी बीड जिल्ह्यातील क्रांती सामाजिक समूह चे सर्व मित्र परिवार वतीने अश्या व अपेक्षा व्यक्त करतो पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..