उत्तर प्रदेशातील सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना जाहीर फाशी द्या व सीबीआय मार्फत चौकशी करा

103

🔸महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑक्टोबर):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने विभागीय महसूल आयुक्त यांना रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित युवती मनिषा वाल्मिकी युवतीचा सवर्णा समाजातील समाजकंटकांनी बलात्कार करून तिला जिवे ठार मारले त्या अनुषंगाने त्या नराधमांना वर जलद न्यायालयात खटला चालून त्यांना जग जाहीर फाशावर लटकावण्यात यावे.

तसेच या संपूर्ण घटनेचा तपास सीबीआयमार्फत करावा तसेच हाथरस जिल्ह्यातील पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री नंतर परस्पर अंत्यसंस्कार केले याचीही गंभीर नोंद घेऊन पोलिसांवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे संपूर्ण भारत भर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

रि.पा.ई (आठवले)उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र नेते बाळासाहेब पगारे, युवा नेते जयेशभाई सोनवणे, युवा नेते विक्रांतभाई गांगुर्डे, राहुलजी शार्दुल,केतन तेजाळे, प्रशांतभाऊ गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.