कवडू लोहकरे यांना राज्यस्तरीय वृक्ष मित्र पुरस्कार जाहीर

33

🔹२५ आॅक्टोबर ला पार पडणार पुरस्कार वितरण समारंभ

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.1ऑक्टोबर):-तालुक्यात वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन व वन्यजीव संवर्धनाची चळवळ तयार करणारे पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांना सन २०२०-२०२१ या वर्षी चा राज्य स्तरीय वृक्ष मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रीन फाउंडेशन यांचे कडून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण २५ आॅक्टोबरला पार पडणार आहे. सन्मान पत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. राज्यात २० व्यक्तींना” वृक्ष मित्र” पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कवडू लोहकरे यांचा समावेश आहे.

कवडू लोहकरे यांनी ५ वर्षापासुन वृक्ष संवर्धन, जल संवर्धन, वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चळवळ उभी केली. प्लास्टिक मुक्त अभियान, पक्षी संवर्धन या क्षेत्रात जनजागृती करुन पर्यावरण संवर्धनाचे धडे लोकांच्या हदयात गिरविले. चिमुर तालुक्यात पर्यावरण संवर्धन सबंधी नवनविन कार्यक्रम घेऊन छोट्या बालकांपासुन तर युवा वर्गा मध्ये पर्यावरणाचे बिज रोवले.

त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य ग्रीन फाऊंडेशन कडुन ह्या वर्षी चा राज्य स्तरीय “वृक्ष मित्र” पुरस्कार जाहीर करण्यात आला. ग्रीन फाऊंडेशन यवतमाळ चे अध्यक्ष अमोल भालेराव,पर्यावरण संवर्धन समिती चिमुर, पर्यावरण संवर्धन समिती भिसी, पर्यावरण संवर्धन समिती नेरी यांचे कडुन अभिनंदन करण्यात आले.