
🔸सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांची मागणी
✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)
अहेरी(दि 1ऑक्टोबर):– उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील चंपा या गावी गत 19 सप्टेंबर रोजी एका निरागस तरुणीवर नराधमांनी अमानवीय कृत्य केल्याने उपचारादरम्यान मंगळवार 29 सप्टेंबर रोजी मुलीची प्राणज्योत मावळली. नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रसिद्धीपत्रकानवे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेंद्र अलोने यांनी नमूद केले आहे की, हाथरस येथील नराधम आरोपींचा घटनाक्रम लक्षात घेता अत्यंत अमानवीय व घृणास्पद प्रकार असून मानवतेला काळिमा फासणारा आहे त्यामुळे हाथरस हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून पीडित परिवाराला न्याय आणि नराधमांना फासावर लटकविण्याची मागणी सुरेंद्र अलोने यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात मुली व महिलांवर अन्याय-अत्याचारात वाढ झाली असून हाथरस येथील हत्याकांडात निषेध करण्यासाठी शब्द अपुरे पडत असल्याचे सुरेंद्र अलोने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले असून उत्तर प्रदेशात मुली सुरक्षित नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून पीडितांना योग्य न्याय आणि नराधमांना फासावर लटकविण्याची तीव्र मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.