मंगरूळ ता घनासावंगी चे सुपुत्र पोलीसनायक भाऊराव वाव्हळ यांचा जालना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव

27

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)
मो:-9881292081

जालना(दि.2ऑक्टोबर):-संपूर्ण भारतासह अखिल जगात कोवीड 19 या महाभयंकर महामारी ने सर्व जग भयभीत असतांना व अनेक जणांना या भयानक व्हायरस ची लागण होऊन आपले प्राण मूकवावे लागले असतांना या अत्यंत कठीण काळात जालना पोलीस दलात सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे मंगरूळ ता.घनासावंगी जिल्हा जालना येथील सुपुत्र पोलीसनायक श्री भाऊराव बन्सीधर वाव्हळ यांचा चांगले कर्तव्य बजावून आपली जबाबदारी अत्यंत निष्टापूर्वक पार पडल्याबद्दल जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निपुण विनायक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देत गौरव करण्यात आला.

गौरवार्थ दिले गेलेल्या प्रशस्तिपत्रकमधील संदेशात मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी म्हटलं आहे की, मार्च 2020 पासुन आत्तापर्यंत या महाभयंकर महामारीचा जालना शहरातसामना करीता असतांना आपल्या स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता अत्यंत समर्थपणे सामोरे जाऊन महामारीस कारणीभूत असलेल्या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार व सध्याचे केंद्रात असणारे मोदी सरकार यांनी वेळोवेळी घालुन दिलेले गाईडलाईन्स चे पालन करीत व इतर जनतेला कोरोना पासून बचाव होण्यासाठी सर्वांना नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन व सूचनांचे पालन करण्यास अहोरात्र व काटेकोर अंमलबजावणी करत आहात असं मा.पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तिपत्रकात म्हटलं आहे.

तसेच मानवतेचा द्रुष्टीकोण नजरेसमोर ठेऊन आपण या गंभीर काळाच्या प्रसंगी गरजूंना आवश्यक असणाऱ्या वस्तुसह, मास्क, सॅनिटाइझरचे वाटप करून जनसामान्यांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.विविध राजकीय, सामजिक संस्था व संघटना, जालना नगरपरिषद, प्रशासकीय कार्यालये,हॉस्पिटल्स इत्यादीशी योग्य समन्वय साधत आपले कर्तव्य चोख बजावले आहे असं प्रशस्तिपत्रकात म्हटलं आहे.

तसेच या काळात आलेल्या सण, उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्या बरोबरच धर्मीक व जातीय सलोखा राखण्याचे महत्वपूर्ण कार्य करून अत्यंत चांगली कामगिरी पार पाडली ती कौतुकास्पद आहे.
या कठीण काळादरम्यान आपण केलेले कार्य उल्लेखनीय व वाखाणण्याजोगी आहे.या संकटकाळात स्वतः बरोबरच कुटुंबातील इतर सर्व सदस्याच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण यशयस्वीपणे लढा देत आहात.भविष्यात देखील आपण आपले कर्तव्य प्राधान्याने पार पाडाल अशी अशा व्यक्त करतो व आम्हांस आपला सार्थ अभिमान असल्याचे मा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रात म्हटले आहे.

व शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच भाउराव वाव्हळ यांचे मुळ गांव मंगरूळ गावकऱ्यांच्या वतीने , सर्व आप्तेष्ट , मित्रमंडळ यांच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन करून कौतुक करण्यात येत आहे.