
✒️परभणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)
परभणी(दि.2ऑक्टोबर):- सुप्रसिद्ध वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस ची आज मुख्य संपादक , सुग्रीव मुंडे यांच्या अध्यक्षते खाली परभणी येथे बैठक संपन्न झाली यावेळी उपस्थीत , परभणी चे भुसारी होते . शहरात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले तेव्हा सर्व प्रतिनिधी सोबत मीटिंग घेण्यात आली.
यावेळी मुख्य संपादक सुग्रीव मुंडे साहेब यांनी त्यांच्या प्रतिनिधी शी समाजातील वेगवेगळ्या विषयावर समस्यांवर चर्चा केली त्यावेळेला जिल्हा प्रतिनिधी प्रसाद पोळ, परभणी शहर प्रतिनिधी गावंडे, विजय चट्टे जिंतूर तालुका प्रतिनिधी सय्यद फिरोज लाला गंगाखेड तालुका प्रतिनिधी राजपाल दुर्गे, ग्रामीण प्रतिनिधी संतोष सुरवणसे, आदी उपस्थीत होते.
दैनिक आत्ताच एक्सप्रेस हे वृत्तपत्र समाजातील विविध विषयाचा अभ्यास करुन , प्रत्येक बातमीचा पाठपुरावा करुनच , अन्याया विरूध्द लढणाऱ्यांनपैकी एक वृत्तपत्र आहे .सामाजिक, राजकीय , क्रिडा साहित्य या सर्व क्षेत्रास वेळीवेळीत्यांच्या माध्यमातून योग्य ते स्थान देत आले आहे.
अन्याय आणिभ्रष्टाचाराच्या विरोधात वृत्तपत्रानी त्याची कायम भूमिका निभावली आहे , शेतकरी व सामान्याच्या व्यथा ला वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका वृत्तपत्र निभावत आहे .