ग्रामपंचायत कार्यालय सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे महात्मा गांधी जयंती साजरी

7

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-9307896949

नायगाव(दि.2ऑक्टोबर):- महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा गांधी यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर आपल्या गावचे तरुण क्षेत्रामध्ये काम करून आपले नाव गावाचे नाव लौकिक करणारे दिगंबर हनमंतराव मुदखेडे यांना महात्मा फुले महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच भगवानराव देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ फळ व निवड प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मणराव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबरराव जाधव, पोलीस पाटील निळकंठराव पाटील , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग वडजे , चेअरमन हणमंतराव पाटील मुदखेडे, नारायण काळेवार, भीमराव सज्जन, सुजित वडजे, आदींची उपस्थिती होती.