✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.2ऑक्टोंबर):-स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती प्रा. डॉ. राकेश तलमले यांच्या हस्ते गांधी प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले.

जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी विचार रूपाने आजही आपल्यात आहेत. त्यांच्या विचाराचे अस्तित्वच आपल्याला तारू शकते असे प्रतिपादन रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राकेश तलमले प्रसंगी बोलताना म्हणाले. जयंती प्रसंगी प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की गांधींची शिकवण अखिल मानवजातीला प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमाला प्रा. कुमुद राऊत प्रा. सचिन बनकर श्री. अनिल प्रधान श्री. उमेश राऊत श्री. कनक ठोंबरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED