भिसी प्रशासकाकडून दोघांवर दंडात्मक कारवाई

31

🔺 कोरोणामुळे एकाचा मृत्यू

🔺भिसी येथे पुढील दोन दिवस जनता कर्फ्यूत वाढ

✒️पंकज मिश्रा(विशेष प्रतिनिधी)मो:-9422909534

भिसी(दि.2ऑक्टोबर):- येथे मागील आठ दिवसात चार कोरोणा पॉजेटीव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने भिसी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. भिसीत कोरोणा रूग्णांची वाढती संख्या बघता भिसी ग्रामपंचायतीने मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या जनता कर्फ्यू त पून्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. भिसीत आतापर्यंत कोरोणा रूग्णांची एकून संख्या सात झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणा रुग्णांचा आकडा दहा हजाराच्या पलीकडे गेला असून यामुळे मृतांचा आकडा सुध्दा तिन अंकी आकड्यावर आला आहे. कोरोणा रूग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिनांक २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर दरम्यान जिल्हयात जनता कर्फ्यू ची घोषणा केली होती. जनता कर्फ्यू दरम्यान दवाखाने, औषधी दुकान तथा कृषी केन्द्र व्यतीरीक्त इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. भिसी येथे मागील आठ दिवसात चार कोरोणा पॉजेटीव्ह रुग्ण सापडले त्यापैकी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच त्याच्या संपर्कातील एक व्यक्ती पॉजेटिव्ह निघाली होती.यापूर्वी सुद्धा एक पोलीस कर्मचारी तथा दोन इतर असे तिन व्यक्ती पॉजेटिव्ह निघाले होते.

भिसी येथे रुग्णांची वाढती संख्या बघता भिसी ग्रामपंचायतीचे नवनियुक्त प्रशासक किशोर पिसे तथा ग्रामसेवक ठाकरे यांनी पुढील दोन दिवस पुन्हा जनता कर्फ्यू चे आव्हान केले असुन भिसी व्यापारी असोशिएशन ने सुद्धा शंभर टक्के पाठींबा दिला. परंतु आज दि. २ ला काही व्यापारी आपली दुकाने उघळून वस्तूंची विक्री करतांना आढळले असून ग्रामपंचायत तफै एका व्यवसायीकावर दोन हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच मास्क न लावता फिरणाऱ्या एका व्यक्तीवर सुध्दा दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी भिसी ग्रामपंचायत चे प्रशासक किशोर पिसे, ग्रामसेवक ठाकरे सोबत ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्यीत होते. तसेच जनता कर्फ्यू त स्थानीक जनतेने सहकार्य करावे असे आव्हान सुद्दा ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले.