🔸आॕनलाईन विद्यार्थांचा सहभाग

🔹सर्वाना विद्यार्थांच्या येत होत्या आठवणी

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.2ऑक्टोबर):-अंजनसिगी येथिल श्री कान्होजीबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी ता.धामनगावरेल्वे जि.अमरावती येथे सोशल डिस्टंशिंगचे नियम पाळून महात्मा गांधी यांची 151 वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रथम प्राचार्य बि.एम गाढवे यांनी प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पन केले.दिपप्रज्वलित केल्यानंतर प्राचार्य ने आपले उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थांचा आॕनलाईन सहभाग होता.कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी सहभागी होऊ शकले नाही.

आजचा हा दिवस संपुर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.अहिंसा हे नाव घेताना पहील नाव बापू चेच घ्यावे लागते .रघुपती राघव राजा राम हे त्यांच आवळत भजन होत. कार्यक्रमाचे अध्यक्षबी एम गाढवे यांनी उपस्थितांना कोरोना काळात सुरक्षिततेवर भर द्यावा , शासनाच्या नियमावलीचे पालन करावे,मास्क घालावे,नेहमीच हात स्वच्छ धुवावे अश्या सुचना दिल्या .शाळेतून वर्ग 5 ते 12 पर्यत आॕनलाईन शिक्षण सुरु आहे.

यावेळी प्रा.अतुल ठाकरे ,प्रा किशोर देशकर, प्रा दिपक अंबरते ,विनोद इंगोले , एल डि देशमुख , गोपाल कांडलकर ,प्रविन राठोड,मनोज सोळंके ,विजय सोळंके ,शेखर झाडे,यु.डि.चांबटकर,सतिश उईके ,सुभाष नांदणे ,सुनिल ठाकरे ,संजय ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिपक अंबरते यांनी केले आभार एल डि देशमुख यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED