ऊसतोड कामगार अपहरण – नविन एस.पी. पुढे आव्हान

19

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.2ऑक्टोबर):-राणा बोर्डे यास गेवराई पोलीस स्टेशन हद्दीतून बळजबरीने ऊसतोड मुकादम दिगंबर माने यांनी घेऊन गेले आहेत अशी तक्रार ऊसतोड कामगार यांच्या पत्नी द्वारकाबाई रामा बोर्डे यांनी एस पी कार्यालय दाखल केली आहे, बीड सह महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा प्रश्न ऐरणीवर असताना गेवराई येथील धक्कादायक प्रकार घडला असून जातीने आदिवासी भिल्ल समाजाचे असलेले राणा बोर्डे यांच्याकडे उचल आहे.

तो कामाला येत नव्हता म्हणून त्याला ऊसतोड मुकादम स्वतःच्या ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी डांबून ठेवले आहे, अशी तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा अधिक्षक यांच्याकडे केली आहे,यासाठी दात फिरियाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता गेवराई येथील पोलिस स्टेशन मधून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामध्ये माजी आमदार सदितील हात असल्याचं बोललं जात आहे दिगंबर माने याने ऊसतोड कामगाराला बोलेरो गाडीतून रात्री बारा वाजता उचललं आहे अशी तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.