🔹1 लाख में टन उस गाळपाचे उद्धिष्ट : ऍड. गणेश पाटील कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजूबापु पाटील, महेश पाटील आणि अनंतराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2ऑक्टोबर):-यंदा कृषिराज साखर कारखान्याने 1 लाख टन उस गाळपाचे उद्धिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजुबापू पाटील यांच्यावर मोठा विश्वास होता, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता चालू गाळप हंगामात कारखान्याला गाळपासाठी येणाऱ्या उसाला इतर कारखान्या प्रमाणे दर देणार असल्याचे प्रतिपादन कृषिराज शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक ऍड. गणेश पाटील यांनी केले.

भोसे ( ता. पंढरपूर ) येथील कृषिराज शुगर कारखान्याच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ऍड. पाटील बोलत होते.

गाळप शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित शेतकर्याना मार्गदर्शन करताना ऍड. गणेश पाटील

यावेळी ह. भ.प. जयवंत महाराज बोधले, भोसे विकास सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी उपसरपंच शेखर (भैय्या) पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, जि.प. सदस्य अतुल खरात, शहाजीराव पाटील, यशवंतभाऊ पाटील पत संस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, सरपंच आदिनाथ देशमुख, माउली कोरके, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ह.भ.प. जयवंत महाराज बोधले महाराज म्हणाले की, राजुबापू पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याची उभारणी केली. शेतकरी हा केंद्रबिंदु मानून राजकरण केले, तीच परंपरा गणेश पाटील आणि पाटील परिवार अखंडित ठेवतील.

राजूबापू पाटील यांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या कृषिराज शुगरचा या दुसराच गाळप हंगाम असून यंदा प्रथमच बापूंच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बापूंसह पाटील कुटुंबातील 3 सदस्यांच्या अकाली जाण्याने या कार्यक्रमावर ही शोककळा दिसून आली.

यावेळी आदिनाथ देशमुख, अतुल खरात यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रस्ताविक शहाजीराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमास मारुती कोरके, दिलीप कोरके, चांगदेव जमदाडे, सुनील तळेकर, धैर्यशील पाटील, आशिष पाटील, नागनाथ भांडे, अविनाश पाटील, सुधीर व्यवहारे,कालिदास साळूंखे,बंडू पवार आदी उपस्थित होते.

कृषिसंपदा, नांदेड, पर्यावरण, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED