उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी बलात्कार,हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा द्या

  38

  ?सामाजिक कार्यकर्ता शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी

  ?नायगांव पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.2ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पिडीत मृत मनिषा वाल्मिकी हिच्यावर झालेला सामुहिक अत्याचार व तिच्या खुनाच्या घटनेतील सदरील आरोपी नराधमांनी पिडीतेवर दि. १४ सप्टेंबर रोजी अत्यंत घ्रनास्पद व अमानवीय तिचे जिभ कापून. पाठीचा कणा मोडून जबरदस्तीने तिच्यावर सामुहिक अत्याचार करून तिला जखमी अवस्थेत सोडून दिले तिचा दि.29 सप्टेंबर 2020 रोजी नराधमांनी केलेल्या अमानवीय कृतीमुळे मृत्यू झालेली आहे.

  सदरीलअसलेल्य प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा करावी पिडीत मनिषा वाल्मिकी व त्यांच्या कुटूंबियांना जलदगतीने प्रकरण चालून आरोपींना फाशी देऊन न्याय द्यावे या मागणी च्या निवेदनावर शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर राजेंद्र तुकाराम कांबळे, संभाजी शंकरराव पांचाळ सचिन सुरेशराव फुलारी, यांच्या सह्या आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी अमानवीय निर्दयी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अन्याय-अत्याचार होत आहे ही खेदाचीच बाब आहे त्यामुळे देशात महिला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  या अमानुष घटनेने अधोरेखित होत आहे, जोपर्यंत अशा नराधमांना फासावर लटकवून फाशी दिली जात नाही तोपर्यंत तो पर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत यासाठी अस्या नराधमांना तात्काळ लटकवून फाशी झाली पाहिजे असे निषेधार्थ मत सामाजिक कार्यकर्ता शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केली.