बैलगाडी लॉंगमार्च-शेतकरी व कामगार बचाओ

    37

    ✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.2ऑक्टोबर):-देशातील शेतकरी व कामगार यांना देशोधडीला लावणारे विविध विधेयके केंद्र सरकारने संसदेमध्ये मंजूर करून घेतले आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून आज २ ऑक्टोबर रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लॉंगमार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात होऊन, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लॉंगमार्च ची सांगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर करण्यात आली.

    यावेळी काँग्रेसचे हदगाव तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप शिंदे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोपाळराव पवार , विश्वजित अडकीने, सीताराम पाटील उपस्थित होते.