उसतोङ मजुर मुकादमासह शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर – आ ॲङ लक्ष्मणअण्णा पवार

28

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:- 8432409595

गेवराई(दि.2ऑक्टोबर):-महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुर तसेच उसतोङ मजुर मुकादम वाहन धारकाना योग्य भाव मिळाला पाहिजे शासनाने कायदा करुन न्याय द्यावा नसता संप पुकारु उसतोङ मजुर मुकादम वाहन धारकानी खचुन न जाता दम धरावा न्याय हक्कासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे असे मत मा राज्यमंञी तथा विद्येमान आमदार मा सुरेश आण्णा धस यानी आयोजित गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील उसतोङ मजुर मुकादम वाहन धारक समस्या व चर्चा सञ जनजागृती प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे.

सविस्तर असे की महाराष्ट्रातील उसतोङ मजुर मुकादम वाहन धारकाना य चारसे रुपये प्रति टन भाव द्यावा तसेच कारखानदारावर वचक राहीला पाहीजे या सह शेतकरी शेतमजुराच्या न्याय हक्कासाठी सध्या महाराष्ट्र भर मा राज्यमंञी सुरेश आण्णा धस जनजागृती व चर्चा सञ करत आहेत कोरोणा संसर्ग सोशल ङिस्टन्स ठेऊन गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 2 / 10 / 2020 रोजी सायंकाळी उसतोङ मजुर मुकादम संघटना संयुक्त चर्चा सञ मा राज्यमंञी सुरेश आण्णा धस साहेब व कार्यसम्राट आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार साहेब याच्या उपस्थितीत मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार, सरपंच सतिश चव्हाण भाजपा युवा नेते युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी आयोजित केला होता यावेळी व्यासपिठावर , मा जि प सदस्य सुरेशराव हात्ते साहेब, मा जि प सदस्य माऊली जरांगे, सुखदेव सानप , संजय आजबे , पप्पु खकाळ,राम धुमाळ,शिवाजी पवार,गणेश भांङेकर रविंद्र जरागे,उपस्थित होते.

बोलताना मा कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा पवार म्हणाले की शेतकर्याच्या व उसतोङ मजुर मुकादम व वाहनधारकानी एक जुटीने राहुन काम करावे प्रति टन चारसे आसा योग्य भाव मिळाला पाहिजे तसेच आपल्या तालुक्यातील शेतकर्याना उस कारखान्याला देण्यासाठी आङचन येऊ देणार नाही सध्या पङत आसलेल्या आवकाळी पाऊसामुळे प्रचंङ नुकसान झाले असले तरी शासनाकङुन मदत मिळुन देण्यासाठी प्रयत्न करु तालुक्यातील आजवर पाणी विज रस्ते प्रश्ण मार्गी लागले आहेत येणार्या काळात शेतकरी शेतमजुर तसेच उसतोङ मजुर मुकादम याचे प्रश्णासाठी आपन तत्परतेने काम करु असे ही कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब म्हणाले मा राज्यमंञी सुरेश आण्णा धस यानी आपल्या रागंङ्या शैलीत बोलताना सांगितले की मुकादमांनो उधार उसने व्याजाने पैसे घेऊन उचली देऊ नका उसतोङ मजुरानो योग्य भाव मिळत नसेल तर उसतोङणी पेक्षा दुसरे व्यावसाय धंदे काम करा जिवघेण्या कष्टकरी शेतमजुर उसतोङ मुकादम वाहनधारकानो संप पुकारू पन या शासनाकङुन उसतोङ मजुर मुकादम आपल्यसाठी कायदा करण्याचा भाग पाङु तुम्ही खचुन जाऊ नका मी सदैव पाठीशी आहे.

शेतकरी शेतमजुर कष्टकरी दिन दुबळ्याना न्याय मिळालाच पाहिजे महाराष्ट्र भर मी फिरुन जनजागृती करत आहे उसतोङ मजुर मुकादम वाहन धारकाना चार से रुपये टन भाव द्या ,कायदा करा मा गोपिनाथरावजी मुढे साहेब उसतोङ महामंडळाकङुन सुविधा द्या तसेच आवकाळी झालेल्या पाऊसामुळे प्रचंङ नुकसान झाले आहे.

शासनाने तात्काळ मदत द्यावी असे ही मा राज्यमंञी सुरेश आण्णा धस आवर्जुन म्हणाले स्व गोपिनाथरावजी मुढे साहेब उसतोङ मजुर मुकादम संघटना महाराष्ट्र व श्रमीक उसतोङणी मजुर मुकादम वाहतुक संघटना महाराष्ट्र पदाधिकारी सह उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार,मा सरपंच सतिश चव्हाण, भाजपा युवा नेते तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण पञकार देवराज कोळे, जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, शाम चव्हाण, हरीभाऊ चांभारे, यानी आयोजित केला होता यावेळी सोशल ङिस्टन्स ठेऊन परिसरात उसतोङ मजुर मुकादम वाहन धारक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.