✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2ऑक्टोबर):-कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ गळीत हंगामाचा बाँँयलर अग्नि प्रदीपन समारंभ ता. ०२ आँँक्टोबर २०२० रोजी संपन्न झाला. यावेळी समर्थ युनिट नं.१ ची बाँँयलर अग्नि प्रदीपन पुजा कारखान्याचे संचालक श्रीरंगराव पैठणे, सरदारसिंग पवार, मनोजकुमार मरकड, सुरेशराव औटे, विकास कव्हळे, किरण तारख, नरसिंगराव मुंढे, पाराजी सुळे व सदाशिव दुफाके यांचे शुभहस्ते सपत्नीक सकाळी १० वाजता व युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरी ची बाँँयलर अग्नि प्रदीपन पुजा कारखान्याचे उपाध्यक्ष श्री.उत्तमराव पवार, कारखान्याचे संचालक अमरसिंह खरात, कैलास जिगे, त्र्यंबकराव बुलबुले, अशोक आघाव, शेषराव जगताप, दत्तु जाधव, तात्यासाहेब उढाण यांचे शुभहस्ते सपत्नीक दुपारी ३.०० वाजता संपन्न झाली.

मागील हंगाम २०१९-२० मध्ये युनिट नं.१ अंकुशनगर येथे ४७९९०५ मे.टन ऊसाचे गाळप  होऊन ५२५०५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.९४% मिळाला  आहे. तसेच युनिट नं.२(सागर) तिर्थपुरी येथे २८९३७७ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ३१५०५०क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.८९% मिळाला आहे.  या हंगामात गाळप केलेल्या ऊसास कारखान्याने रु.२६००/- प्रती मे.टन प्रमाणे ऊस दर अदा केला आहे. कारखान्याचे अर्कशाळा प्रकल्पामध्ये ३४.२१ लाख बल्क लिटर्स अल्कोहोलचे व २६.५० लाख बल्क लिटर्स इथेनाùलचे उत्पादन झाले. वीज निर्मीती प्रकल्पामध्ये ५.०८ कोटी युनिट वीज निर्मीती झाली त्यापैकी कारखान्याने स्वतःसाठी १.६२ कोटी युनिट वीजेचा वापर केला व उर्वरीत ३.४५ कोटी युनिट वीज महावितरण कंपनीस विक्री केली आहे. 

गळीत हंगाम २०२०-२१ करिता २३७२४.३६  हेक्टर ऊसाची नोंद झाली असून हेक्टरी ८० मे.टन प्रमाणे १८.९८ लाख मे.टन व नोंदणी व्यतिरिक्त  २१०३.८० हेक्टर ऊस क्षेत्रापासून १.६८ लाख मे.टन असा एकुण  २५८२७.९६ हेक्टर क्षेत्रापासून अंदाजे २०.६६ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. यापैकी कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगरकडे अंदाजे ८.०० लाख मे.टन व युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडे अंदाजे ५.०० लाख मे.टन असे एकुण अंदाजे १३.०० लाख मे.टन ऊसाचे गळीत होईल. दोन्ही युनिटचे ऊस गाळप विचारात घेऊन कार्यक्षेत्रात अंदाजे ७.६६ लाख मे.टन ऊस अतिरिक्त होईल.  अतिरिक्त ऊसाचे विल्हेवाटीसाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे.  कारखान्याचे दोन्ही युनिटचे रिपेअर व मेन्टेनन्सचे कामे पुर्ण झाली आहेत. कारखान्याचे दोन्ही युनिटसाठी क्षमतेप्रमाणे ऊसाचा पुरवठा व्हावा यासाठी सक्षम ऊस तोड व वाहतुक यंत्रणा भरती केली असून त्यांना अùडव्हान्स वाटप केला आहे. ऊस गळीत सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी कारखान्याने पुर्ण केली आहे. आँक्टोबरच्या दुस-या आठवड्यात   कारखान्याचे दोन्ही युनिटचे गाळप सुरु होईल. शेतकरी बांधवांनी शेतातील मातीचे माती परिक्षण करुन घ्यावे, ऊस पिकासाठी ठिबक सिंचन करावे, ऊस पिकासाठी कारखान्याद्वारे निर्मीत गांडुळ खत, कंपोस्ट खताचा वापर करावा. मोबाईल अँँपद्वारे आँँन लाईन ऊस नोंद व तोड कार्यक्रम पारदर्शकपणे राबविला जाणार आहे. 

याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक,  खातेे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व मोठया संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, सभासद उपस्थित होते. 

नांदेड, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED