शिवराज्य संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदी विक्रम पाटील बामणीकर

39

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2ऑक्टोबर):- महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणारे संघटना म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या शिवराज्य युवा संघटनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख म्हणून विक्रम पाटील बामणीकर यांची लातूर येथे विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये शिवराज्य युवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता दादा करडे यांच्या हस्ते विक्रम पाटील बामणीकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले विक्रम पाटील बामणीकर यांची मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजातील अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात चांगले काम करत असल्यामुळे त्यांच्या कामाची शिवराज्य युवा संघटनेने दखल घेऊन त्यांना नांदेड जिल्हा प्रमुख पदी निवड केली आहे शिवराज्य युवा संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात केले जात आहे.

त्यामुळे विक्रम पाटील बामणीकर यांची समाजाप्रती तळमळ ज्या ठिकाणी गरीबावर अन्याय होईल त्या ठिकाणी विक्रम पाटील बामणीकर यांनी पल्या समाज कार्यातून त्यांना न्याय दिला शेतकर्‍यांसाठी आंदोलन विविध मागण्यांची शासन स्तरावर आपल्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन देऊन पोहोचवण्याचे काम विक्रम पाटील बामणीकर यांनी नांदेड जिल्ह्यात केले असल्यामुळे विक्रम पाटील बामणीकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आज शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्हा प्रमुख निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.