
🔺पाठबंधारे विभागाची डोळेझाक
✒️नवनाथ पौळ(केज,विशेष प्रतिनिधी)
मो:-८०८०९४२१८५
केज(दि.3ऑक्टोबर):-केज तालुक्यातील धनेगांव कॅम्प येथे असणाऱ्या पाठबंधारे विभागाची मांजरा वसाहत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मांजरा धरण स्थापनेपासून धनेगांव कॅम्प येथे मांजरा वसाहत तयार करण्यात आली होती येथील मांजरा वसाहतीत असणारे वृक्ष अज्ञात व्यक्तीने तोडून टाकण्यात आले आहे.
ही घटना सदरील वसाहतीच्या ठिकाणी शासनाने लाखो रुपये खर्च करून प्रशस्त कार्यालय व वसाहत निर्माण केलेली असताना येथील कार्यालय लातूर येथे हलवण्यात आले असून त्यामुळे धनेगाव येथील मांजरा धरणाचा कारभार हा राम भरोसे असल्यागत चालू असून याठिकाणी वसाहत उपलब्ध असताना कोणीही कर्मचारी इथे उपस्थित राहत नाहीत त्यामुळे असे प्रकार नेहमी होत आसतात. वसाहतीकडे पाठबंधारे विभागाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष व नियंत्रण नसते त्यामुळे हे प्रकार घडत आहे असे मत संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील जाहिरातींसाठी संपर्क
नवनाथ पौळ
मो-८०८०९४२१८५
केज तालुका प्रतिनिधी