शेतकरी-कामगार विरोधी कायद्याचा निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन

31

🔺उत्तर प्रदेशात राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध

🔺हाथरस येथील मृत तरूणीला श्रद्धांजली वाहण्यात आली

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.3ऑक्टोबर):-केंद्रातील भाजप सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके व कामगार विरोधी विधेयके हुकूमशाही पद्धतीने मंजूर करून घेतल्यामुळे जनसामान्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हे अन्यायकारक कायदे मागे घेण्यात यावीत, या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सातारा येथे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शेतकरी-मजदूर बचाव, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, केंद्र सरकारचा निषेध असो अश्या जोरदार घोषणा दिल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व कामगार विरोधी कायदे अन्यायकारक असून केंद्र सरकारने सदरील कायदे रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी डॉ. जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विरोधात असलेली ३ विधेयके सरकारने घाईगडबडीने आणि दडपशाहीने पास करुन घेतली आहेत. या विधेयकामध्ये एम.एस.पी किमान आधारभुत किंमतीचा कुठेही उल्लेख नाही. तसेच ज्याठिकाणी शेतकरी आपला माल विकतो त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बद्दल सुध्दा काही नमूद केलेले नाही. त्यात आणखी एक फसवी घोषणा म्हणजे आपला माल कुठेही जाऊन विका. पण यामुळे अल्पभुधारक शेतकरी भरडला जाईल कारण, माल विकण्यास दळणवळणाची व्यवस्था आणि अंतर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसेच या विधेयकात करार पध्दतीने शेती या नावाखाली फसवणूक करून घरच्याच शेतात कामगार बनवले जाणार. पुढे शेतमाल जीवनावश्यक वस्तू फळे भाजीपाला यांची साठवणूक करण्यातची मर्यादा पूर्णपणे काढून टाकल्या मुळे साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांना यामुळे वाव मिळणार आहे. एकंदरीत हे विधेयक म्हणजे शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा कायदा आहे.

उत्तर प्रदेशात राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करून योगी सरकारच्या दडपशाही बद्दल जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हाथरस येथील मृत तरूणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सकाळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस जयंती निमित्त पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संजय बालुगडे, विजयकुमार भोसले, मनोजकुमार तपासे, धनश्री माहाडिक, सुषमा राजेघोरपडे, मालन परळकर, रझिया शेख, माधुरी जाधव, आमित जाधव, ऋषीकेश ताटे, किशोर जगदाळे, दिपक कांबळे, सौरभ साळुंखे, रोहित झांजुर्णे, सागर साळुंखे, अँड दतात्रय धनवडे, शरद मोरे, नाना लोखंडे, प्रकाश फारांदे, मुरलीधर पवार, अन्वर पाशा खान, बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार, अमर करंजे, संदिप माने, संतोष डांगे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.