
🔺खा.राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या अटकेचा व धक्काबुक्कीचा केला तीव्र जाहीर निषेध!
🔺शेतकरी विरोधी कायद्याचा तीव्र निषेध!
✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.3ऑक्टोबर):-त्तरप्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा मंगळवारी दिल्लीच्या सफरदगंज रुग्णालयात मृत्यू झाला सदर पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असतांना काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली.
तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केला आहे
सदर घटनेच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी स्थानिक काँग्रेस कार्यालयाच्या समोर काही काळ धरणे आंदोलन केले आणि कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर उतरून टायर जाळून निषेध करण्यात आला तसेच या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने सुद्धा केली.
याप्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके,जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर,जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे,जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, ब्रह्मपुरी नगर परिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती विलास विखार,नगरसेवक डॉक्टर नितीन उराडे, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायर कर,ब्रह्मपुरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगलाताई लोनबले,ब्रह्मपुरी शहर काँग्रेस अध्यक्ष योगिताताई आमले,नगरसेवक तथा ब्रह्मपुरी शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, ब्रह्मपुरी ब्लास्टचे संपादक तथा वरिष्ठ पत्रकार नेताजी मेश्राम, प्रमोद मोटघरे, चिमुर विधानसभा काँग्रेस अध्यक्ष काशिनाथ खरकाटे,जगदीश तलमले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश तलमले, माजी नगरसेवक संजय ठाकूर,उमेश धोटे,वखार खान, ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश बानबले,मालडोंगरीचे माजी सरपंच राजेश पारधी,संदीप बगमारे,बाळू साखरे ब्रह्मपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी पारधी,रुपेश चौधरी,सुधीर ठिकरे,ब्रह्मपुरी काँग्रेस कार्यालय प्रमुख सुधीर पंदिलवार,कार्यालय कर्मचारी सुरेश वंजारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते
आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे व पीडितेला त्वरीत न्याय द्यावा अशाप्रकारचे निवेदन यावेळी देण्यात आले.
तसेच शेतकरी विरोधी कायदा सुद्धा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदनही देण्यात आले.