क्रांतीकारी तुषारदादा उमाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आॅनलाईन काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर

71

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.3ऑक्टोबर):-संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेश संघटक मुलुख मैदानी तोफ ,युवा वक्ते ,शिवश्री .तुषारदादा उमाळे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीकारी तुषारदादा आॅनलाईन काव्यस्पर्धेचे संभाजी ब्रिगेड -एक वादळ व तुषारदादा मित्रपरिवार च्या माध्यमातुन आयोजन करण्यात आले .हे आयोजन कवि.विशाल इंगोले (अजातशत्रु ),कवी .अमित अनिल मंदा ,राहुलभाऊ गजभिये ,ओजस केदार ,अॅड.तेजस्वी नलवाडे ,नितिन भोसले ,रविंद्रदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

संपुर्ण महाराष्ट्रातुन ,विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा या सर्व विभागातून एकुण १४६ कवी वाट्सअप गृपला जुळले त्यापैकी ३३ कविंनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या .यामध्ये ६ उत्तेजनार्थ तर प्रथम ,द्वितीय ,तृतिय व चतुर्थ असे क्रमांक जाहीर करण्यात आले .या काव्यस्पर्धेचे समिक्षण कवी.गझलकार विकास भोवते (मुंबई) यांनी केले .या काव्यस्पर्धेत अहमदनगरचे कवी .आशुतोष निकम (प्रथम ) ,यवतमाळचे कवी. प्रदिप बोरकुटे ( द्वितीय ), परभणीचे कवी .श्रीकांत लासुरकर (तृतिय ) व उमरखेडचे कवी. नंदकिशोर रावसाहेब कदम ( चतुर्थ )क्रमांक पटकावला .हा निकाल क्रांतिकारी भगतसिंग जयंती पर्वावर संभाजी ब्रिगेड -एक वादळ या फेसबुक पेजवरून तुषारदादांच्या भगतसिंग व त्यांचे विचार व्यक्त केल्यानंतर देण्यात आला .सर्व कविंना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले .