
✒️लातूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
लातूर(दि.3ऑक्टोबर):-कमल कर्डक ह्या दैनिक मराठवाडा केसरीचे मुंबई महानगर पालिका प्रतिनिधी म्हणुन काम करत आहे,भुमी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या मुंबई अध्यक्षा व समाजसेवा नि:स्वार्थ पणे करुन लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे, ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्यांना न्याय मिळुन देण्याचे काम करत आहे व वृत्तपत्राच्या माध्यमातुन कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात लोकांना जनजागृतीचे अतिशय महत्वाचे उल्लेखनीय कार्य पत्रकारीकतेच्या माध्यमातुन करत आहे.
या कार्याची दखल घेत कु.कमल कर्डक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे,हा पुरस्कार माझा नसुन माझ्या समाजाचा आहे असे पत्रकार कमल कर्डक म्हणाल्या, या पुरस्कारा बद्दल श्री. संजय चव्हाण उद्योजक व श्री. प्रशांत प्रकाश पवार राष्ट्रवादी सोशल मीडिया शिरूर जि. पुणे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे, तसेच राजकिय सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतीक, साहित्य ,कला, क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, आणि पत्रकारीता क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.