✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.३ऑक्टोबर):-तालुक्यातील वडनेर येथील आधारशिला जेष्ठ महिला मंडळ, यांचेवतीनेजेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ महिला सदस्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला.वडनेर येथील संकटमोचन मंगल कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.विमला खत्री.अध्यक्षा
आधारशिला जेष्ठ महिला मंडळ या होत्या.

याप्रसंगी प्रमुख अतिथी वडनेर ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ.कविता वानखेडे,पंचायत समिति सभापतीसौ.शारदाआंबटकर,जिल्हा परिषद सदस्या सौ.जोत्सना सरोदे या उपस्थित होत्या तर मार्गदर्शिका म्हणून प्रा.सौ.लीला नरड़ आधारशिला जेष्ठ महिला मंडळ, वडनेर तसेच अध्यक्षा स्पंदन जेष्ठ महिला मंडळ, हिंगणघाट या हजर होत्या.

कार्यक्रमप्रसंगी जेष्ठमहिला श्रीमती पार्वताबाई आंबटकर श्रीमती सुमतीताई शिंगोटे,सौ.मीराबाई दिवे श्रीमती शोभाताई काळे, सौ.कमलाबाई दिवे इत्यादि मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संकटमोचन मंगल कार्यालयाचे अध्यक्ष श्री श्याम खत्री तसेच आधारशिला जेष्ठ महिला मंडळ सर्व पदाधिकारी व सदस्यभगीनी इत्यादीनी सहकार्य केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED