नथुराम सारख्या प्रवृत्तिच्या माथेफिरू समीर केने ला तात्काळ अटक करा

13

🔺चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांची पोलिसात तक्रार

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु गांधीजींचे विचार हि प्रवृत्ती संपवू शकली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीचा समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात गांधीजींची तुलना आसाराम बापुशी करत अन्य आक्षेपार्य विधान केले आहे. या माथेफिरू विरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे, पोलीस निरीक्षक श्री. बहादूरे शहर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन येथे चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांनी तात्काळ दाखल केली आहे. या माथेफिरूला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण कॉग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, कुणाल चहारे, राजू वासेकर, पप्पू सिद्धीकी यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावर देशाने चालावे. असा संदेश दिला आहे. परंतु त्यांच्याच पक्षातील समीर केने ला नावाच्या माथेफिरू समाज माध्यमावरून महात्मा गांधी विरोधात प्रक्षेपक विधान त्याने केले आहे. त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तुलना बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांच्याशी केली आहे. हि गंबीर बाब आहे.

हा प्रकार अतिशय गंभीर असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच नव्हे तर समस्त भारतीय जनतेच्या अपमान आहे. समाजातील सामाजिक स्वस्थ बिगडू नये याकरिता समाजातील अशा माथेफिरुला तात्काळ अटक करा. अशी मागणी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी केली आहे.