महसूल विभागाने केला अवैध रेती साठा जप्त

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.३ऑक्टोबर):-तालुक्यातील वाघोली शिवारात परवा गुरुवार रोजी अवैधरित्या जमा करण्यात आलेली सुमारे ३६ ब्रास रेती महसूल विभागाचे पथकाने जप्त केली.रेतीसाठयाची किंमत दोन लाख रुपये असून या अवैध रेतीसाठयावर अद्याप कुणीही हक्क सांगितला नाही.
वणा नदी परिसरात तसेच तालुक्यातील अनेक मोठ्या नाल्यातुन नेहमीच अवैध रेती तस्करी होत आहे.रात्रीचे अंधारात येथील रेतीचा उपसा करुन रेतीमाफिया रस्त्यावर याचा साठा करुन ठेवतात,नंतर हि रेती अवैध मार्गाने ठिकठिकाणी विक्री केल्या जाते.

वाघोली शिवारात अशी अवैध रेती चोरटयानी रस्त्यालगत जमा करुन ठेवल्याची माहिती मिळाल्याने येथील मंडळ अधिकारी शाम चन्दनखेड़े, वाघोली येथील तलाठी प्रदीप सवाई यांना मिळाल्याने त्यांनी सदरची कारवाई करुन तीन वेगवेगळ्या ठिकाणी पडुन असलेली सुमारे ३६ ब्रास रेती जप्त करुन तहसीलदार यांचे कार्यालय परिसरात जमा केली.

सदर प्रकरणी जप्त करण्यात आलेली रेती बाजारभावाप्रमाणे अंदाजे २ लाख रूपये किंमतीची आहे.या परिसरातुन रेती वर्धा येथिल रेती माफिया करीत असल्याची माहिती आहे.महसूल विभाग सदर रेतीसाठयाचे पुढे काय करणार या कारवाईकड़े नागरिकांचे लक्ष असून सदर रेतीसाठा लीलाव होणार की एखाद मोठ्या कंत्राटदारास गुपचुप देऊन टाकणार याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.