राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेमध्ये युवा कवी गणपत माखणे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

69

✒️हिंगोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगोली(दि.4ऑक्टोबर):-कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित लॉक डाऊन काळातील कवी या स्पर्धेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक युवा व्याख्याते कवी गणपत विलास माखणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. युवा कवी गणपत माखणे हे पुरोगामी विचारांचे आहेत.

घरची परिस्थिती अगदी जेमतेम आहे परंतु समाजसेवेची आवडते त्यांच्या मनामध्ये आहे. शेतकरी आत्महत्या ,असेल सरकारची धोरणे व त्यापासून अलिप्त शेतकरी,प्रेम कविता लेख अशा अनेक प्रकारे गणपत माखणे कवितेच्या रुपाने लिखाण करत आहेत.शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतीच्या व मातीच्या कविता ते नेहमीच लिहित असतात.

कवी गणपत माखणे यांच्या या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले सर, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन सर, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ समन्वयक प्रा.डॉ. शिवराज बोकडे सर. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. रमेश कुरे सर , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मारुती लुटे सर आई वंदना माखणे व वडील विलास माखणे यांच्याकडून अभिनंदन व कौतुकाची थाप मिळत आहे.

अतिशय ग्रामीण भागातील असून देखील गणपत माखणे हे यशाची पायरी चढत आहेत यामुळे सगळीकडूनच गणपत माखणे यांचे कौतुक केले जात आहे. कविता ही खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे आणि कविच जगन हे कवितेसाठीच असते आणि मरण देखील कवितेसाठीच असते अशाप्रकारे युवा कवी गणपत माखणे हे नेहमी बोलत असतात. आतापर्यंत अनेक वचन स्पर्धेमध्ये गणपत माखणे यांनी उत्स्फूर्त सहभाग व यश संपादन केले आहे.