देवलमारी येथे सिमेंट कारखाना उभारण्यात यावा अन्यथा अंदोलन करू

100

🔹पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

✒️संतोष संगीडवर(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

अहेरी(दि.4ऑक्टोबर):-तालुक्यापासून देवलमारी हे गाव 7 किमी अंतरावर आहे. येथे प्रचंड प्रमाणात सिमेंट खदान असल्याचे माहिती सुमारे 1975 ला महाराष्ट्र सरकारला मिळाली. परंतु सदर क्षेत्र दुर्गम असल्यामुळे, असामाजिक तत्वाचा भीतीमुळे व वनविभागाचा कायद्यामुळे सदरचे क्षेत्र नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढून संपूर्ण क्षेत्राचा विकास खुंटला आहे.

त्वरित शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून सिमेंट कारखाना उभारावा अन्यथा क्षेत्रातील बेरोजगार युवासमवेत आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा विलास पोचमपल्लीवार तालुका प्रमुख शिवसेना अहेरी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिले आहे.
गडचिरोली जिल्याची निर्मिती होऊन बरेच वर्ष लोटून सुद्धा या जिल्याकडे नेहमीच दुजाभाव करण्यात आला आहे. त्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात मुबलक प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्द असून सुद्धा त्याचा कोणताही वापर होत नाही.

विलास पोचमपल्लीवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, देवलमारी क्षेत्रात सिमेंट खदान असल्याचे 1975 ला निष्पन्न झाले. या विधानसभा क्षेत्रात निवडून येणारे प्रतिनिधी प्रत्येक निवडणुकात हाच मुद्धा रेटून भरभरून मत उखडतो परंतु आजपर्यंत याबाबत कसलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. इथे जर सिमेंट कारखाना उभारला असता तर बेरोजगार ची समस्या कायामची सुटली असती. तसेच या क्षेत्राचा विकास अदोगतीने भरभराटीस आला असता. येथील स्थानिक जनतेस प्रत्यक्ष मुलाखत घेऊन युवकांची व्यथा जाणून घेतली.

या क्षेत्राची पूर्ण तपासणी करून प्रत्यक्षात या क्षेत्रात काम सुरु करण्यात यावे व गडचिरोली जिल्यातील आरमोरी तालुक्यात डोंगरगाव क्षेत्राचा ज्याप्रमाणे विकास करण्यात आला तशीच विकासाची गंगा येथे आणावी. सदर माहितीची योग्य दखल घेण्यात यावी अन्यथा शिवसेना शाखा अहेरीचा वतीने विधानसभा क्षेत्रातील स्थानिक बेरोजगार युवासमवेत आंदोलन उभा करण्याचा इशारा शिवसेना अहेरी तालुका प्रमुख विलास पोचमपल्लीवार यांनी दिला.